Shubman Gill Injury Update: शुभमन गिल खेळणार की नाही? भारतीय संघासमोर पेचप्रसंग; तंदुरुस्ती चाचणीकडे सगळ्यांचे लक्ष

Shubman Gill fitness test: कोलकाता कसोटीत पराभूत झाल्यानंतर यजमान भारतीय क्रिकेट संघावर मालिका गमावण्याच्या नामुष्कीचे संकट ओढवले आहे.
Shubman Gill Injury Update
Shubman Gill Injury UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

गुवाहाटी: कोलकाता कसोटीत पराभूत झाल्यानंतर यजमान भारतीय क्रिकेट संघावर मालिका गमावण्याच्या नामुष्कीचे संकट ओढवले आहे.

कर्णधार शुभमन गिलची मानेची दुखापत यामुळे आणखीनच पाय खोलात गेला आहे. शुभमन गिलची तंदुरुस्ती चाचणी उद्या (ता. २१) शुक्रवारी होणार आहे. या चाचणीनंतर त्याचा गुवाहाटी येथील दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धच्या कसोटीतील समावेशाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे या तंदुरुस्ती चाचणीवर विशेष लक्ष असणार आहे.

शुभमन गिलच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल याची चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निवड करण्यात येऊ शकते. साई सुदर्शन या डावखुऱ्या फलंदाजांचाही समावेश करण्यात येऊ शकणार आहे. तसेच अक्षर पटेल व नितीशकुमार रेड्डी यांच्यापैकी एक अष्टपैलू खेळाडूला संघात प्रवेश दिला जाईल. अशाप्रकारचे वृत्त समोर आले आहे.

Shubman Gill Injury Update
IND vs SA 2nd Test: 'करो या मरो' कसोटीत भारत रचणार इतिहास, वर्ल्ड क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरणार तिसरा देश; इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या यादीत होणार सामील

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी पत्रकार परिषदेदरम्यान शुभमन गिलच्या दुखापतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मी स्वत: बुधवारी शुभमन गिलला भेटलो. त्याच्या दुखापतीमधून सुधारणा होत आहे. आता उद्या तंदुरुस्ती चाचणी होणार आहे. फिजिओ व डॉक्टर शुभमन गिलच्या दुखापतीबाबतचा अंतिम निर्णय घेतील.

Shubman Gill Injury Update
IND vs SA ODI Series: रोहित-विराट खेळणार, पण नेतृत्व बदलणार! वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियात होणार मोठा बदल; कोणाच्या गळ्यात पडणार कर्णधारपदाची माळ?

इंग्लंडचा क्रिकेट संघ दुष्काळ संपवणार?

इंग्लंड - ऑस्ट्रेलिया यांच्यामधील ॲशेस या प्रतिष्ठेच्या क्रिकेट मालिकेला शुक्रवारपासून (ता. २१) पर्थ येथे सुरुवात होत आहे. दोन देशांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने २०१०-११नंतर मायदेशात ॲशेस मालिका गमावली नाही. इंग्लंड यंदा ऑस्ट्रेलियातील जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का, असा यक्षप्रश्‍न या वेळी निर्माण झाला आहे. सिडनी येथील अखेरच्या कसोटीत या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com