Womens ODI Cricket: 86 नंतर नाबाद 166! गोमंतकीय कन्येची धडाकेबाज फलंदाजी; हैदराबाद 51 धावांनी पराभूत

Goa vs Hyderabad womens odi: पूर्वजाने तनिशा गायकवाड (३५) हिच्यासह पाचव्या, तर अथश्री शिवारकर (२२) हिच्यासमवेत आठव्या विकेटसाठी प्रत्येकी ५१ धावांची भागीदारी केली.
Goa vs Hyderabad womens odi, purvaja verlekar century
Goa vs Hyderabad womens odi, purvaja verlekar centuryDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सलामीची पूर्वजा वेर्लेकर हिने रविवारी रांची येथे आक्रमक फलंदाजीचे शानदार प्रदर्शन घडविताना नाबाद दीडशतकी धमाका केला, त्या बळावर गोव्याने सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट गटात हैदराबादला ५१ धावांनी नमविले.

पूर्वजा हिने मागील लढतीत दिल्लीविरुद्ध ८६ धावांची खेळी केली होती, तोच फॉर्म रविवारीही कायम राखताना तिने नाबाद १६६ धावा केल्या. त्यामुळे गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २९४ धावा केल्या. नंतर श्रेया परब (३-३५) हिच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर हैदराबादचा डाव संध्या गोरा (८३) हिच्या आक्रमक फलंदाजीनंतरही २४३ धावांत गुंडाळला गेला.

Goa vs Hyderabad womens odi, purvaja verlekar century
C K Nayudu Trophy: गोव्याचा दारुण पराभव! पंजाबचा एक डाव, 296 धावांनी विजय; फलंदाजांची दुसऱ्या डावातही शरणागती

पूर्वजा हिने शानदार दीडशतकी खेळीत १५२ चेंडूंचा सामना करताना १९ चौकार व दोन षटकार मारले. तिने पूर्वा भाईडकर (३७) हिच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. याशिवाय पूर्वजाने तनिशा गायकवाड (३५) हिच्यासह पाचव्या, तर अथश्री शिवारकर (२२) हिच्यासमवेत आठव्या विकेटसाठी प्रत्येकी ५१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे गोव्याला ३ बाद १७ धावांवरून मोठी धावसंख्या रचता आली.

Goa vs Hyderabad womens odi, purvaja verlekar century
C K Nayudu Trophy: गोव्याची पुन्हा एकदा हाराकिरी! बडोद्याविरुद्ध 236 धावांनी गमावला सामना; 4 सामन्यांतील दुसरा पराभव

संक्षिप्त धावफलक

गोवा ः ५० षटकांत ८ बाद २९४ (पूर्वजा वेर्लेकर नाबाद १६६, हर्षिता यादव ०, विनवी गुरव ०, तेजस्विनी दुर्गड ४, कृपा पटेल ८, तनिशा गायकवाड ३५, पूर्वा भाईडकर ३७, श्रेया परब ०, अथश्री शिवारकर २२, पूजा कलेल नाबाद १, यशश्री २-३५, कुंचला नितीशा २-२१) वि. वि. हैदराबाद ः ४६.५ षटकांत सर्वबाद २४३ (जी. तृषा ३३, संध्या गोरा ८३, आकांक्षा सेमवाल २५, के. निधी २४, एम. साक्षी राव २८, मेताली गवंडर ७.५-०-३८-१, हर्षिता यादव ४-०-३२-०, श्रेया परब ९-०-३५-३, पूर्वा भाईडकर ६-०-३१-१, पूजा कलेल ७-०-२८-१, तेजस्विनी दुर्गड ८-०-४६-१, अथश्री शिवारकर २-०-१२-०, पूर्वजा वेर्लेकर ३-०-१८-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com