Santosh Trophy: संतोष करंडक फुटबॉलमध्ये गोव्याला गतवैभवाचे वेध, स्पर्धेच्या पात्रता फेरीत यंदा तगडे आव्हान

Santosh Trophy 2025: माजी विजेत्या गोव्याला संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गतवैभवाचे वेध लागले आहेत.
Santosh Trophy
Santosh TrophyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: माजी विजेत्या गोव्याला संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गतवैभवाचे वेध लागले आहेत. त्यांच्या यावेळच्या पात्रता फेरीतील मोहिमेस २० डिसेंबरपासून सुरवात होईल. ‘ह’ गटात सेनादल व कर्नाटक आदी माजी विजेते संघ असल्याने आव्हान खडतर असेल.

गोव्याच्या पात्रता फेरीतील सामने बंगळूर येथे होतील. पहिला सामना २० डिसेंबर रोजी सेनादलाविरुद्ध होईल, नंतर २२ डिसेंबर रोजी लक्षद्वीपविरुद्ध, तर २४ डिसेंबर रोजी यजमान कर्नाटकविरुद्ध लढत होईल. या गटातून मुख्य फेरीसाठी एकच संघ पात्र ठरणार असल्याने प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल.

संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेची मुख्य फेरी जानेवारी महिन्यात आसाममध्ये खेळली जाईल. स्पर्धेची यंदा ७९वी आवृत्ती आहे. पात्रता फेरीतील नऊ गटात ३५ संघात चुरस असेल. मुख्य फेरीत १२ संघ खेळतील. यजमान आसाम, गतविजेते पश्चिम बंगाल व उपविजेते केरळ या संघांना थेट मुख्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. अन्य नऊ संघ पात्रता फेरीतून दाखल होतील.

Santosh Trophy
Goa Literacy: साक्षरतेत गोवा देशात प्रथम, दर 99.72 टक्‍के : केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्र्यांची माहिती

गोव्याचा संघ

डेनिल रिबेलो, जोसेफ क्लेमेंत, कुणाल कुंडईकर, रीझव्हन फर्नांडिस, उमंग गायकवाड, साल्जियो डायस, स्टेन्डली फर्नांडिस, वेलिंग्टन फर्नांडिस, सनिज बुगडे, क्रायस्लर आफोन्सो, प्रतीक नाईक, तिप्पण्णा भाविकट्टी, श्रीधरनाथ गावस, जोशुआ डिसिल्वा, संकल्प काणकोणकर, ॲरिस्टन कॉस्ता, लॉईड कार्दोझ, आर्नोल्ड ऑलिव्हेरा, ब्रायन फारिया, सेल्विन मिरांडा. अधिकारी ः ओमकार वायगणकर (संघ व्यवस्थापक), कीनन आल्मेदा (मुख्य प्रशिक्षक), हर्षद जल्मी (साहाय्यक प्रशिक्षक), अनिशा प्रियोळकर (फिजिओथेरपिस्ट).

पाच वेळचा माजी विजेता संघ

गोव्याचे आव्हान गतवेळी साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. त्यापूर्वी, त्यांनी २०२३-२४ मध्ये उपविजेतेपद मिळविले होते. गोव्याने एकूण पाच वेळा संतोष करंडक जिंकला असून १४ वेळा त्यांनी अंतिम फेरी गाठली आहे. गोव्याने १९८२-८३, १९८३-८४, १९८९-९०, २००५-०६, २००८-०९ मध्ये संतोष करंडक विजेतेपद मिळविले होते.

Santosh Trophy
Goa Drowning Death: शेजाऱ्याकडे ठेवला, खेळताना तळ्यात पडला; तळेबांद येथे दीड वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू

गोव्यातील फुटबॉल प्रतिभा प्रदर्शित करणारा संतुलित संघ आम्ही निवडला आहे. संतोष करंडक ही एक प्रतिष्ठेची स्पर्धा असून हा संघ शिस्त, निर्धार आणि अभिमानाने राज्याचे प्रतिनिधित्व करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. या मोहिमेच्या प्रारंभापासून खेळाडू व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी आहे.

- कायतान फर्नांडिस, अध्यक्ष-गोवा फुटबॉल संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com