SAFF Championship: पाकिस्तानविना गोव्यात रंगणार 'सॅफ फुटबॉल स्पर्धा'; यजमान भारत, गतविजेत्या बांगलादेशसह एकूण सहा महिला संघांत चुरस

SAFF Women's Championship 2026 Goa: आठव्या सॅफ (दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ) करंडक फुटबॉल स्पर्धेत भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघ सहभागी होणार नाही.
SAFF Women's Championship 2026 Goa
SAFF Women's Championship 2026 GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर नियोजित असलेल्या आठव्या सॅफ (दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ) करंडक फुटबॉल स्पर्धेत भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघ सहभागी होणार नाही. सहा संघांची स्पर्धा २५ मे ते ७ जून या कालावधीत खेळली जाईल.

उपलब्ध माहितीनुसार, स्पर्धेसाठी सहभाग नोंदणी करण्याची अखेरची तारीख ३० मार्चपर्यंत पाकिस्तानने सहभाग पक्का केला नव्हता. त्यामुळे दक्षिण आशियाई विभागातील सात देशांपैकी सहाच देश या स्पर्धेत सहभागी होतील. यजमान भारत, गतविजेत्या बांगलादेशव्यतिरिक्त नेपाळ, श्रीलंका, मालदीव, भूतान हे स्पर्धेतील अन्य संघ आहेत.

SAFF Women's Championship 2026 Goa
Goa Crime: पगार-जेवणाच्या वादातून साळगाव 'दुहेरी हत्याकांड', पाच महिन्यांनंतर संशयित ओडिशातून जेरबंद

भारताने स्पर्धा सर्वाधिक पाच वेळा (२०१०, २०१२, २०१४, २०१६, २०१९) जिंकली असून बांगलादेशने दोन वेळा (२०२२ व २०२४) विजेतेपद पटकावले आहे. दोन वर्षांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या स्पर्धेत बांगलादेशने यजमान देशाला अंतिम लढतीत पराभूत केले होते.

SAFF Women's Championship 2026 Goa
Goa Weather: कडक उन्हात पावसाची एन्ट्री; राज्यात पुढील तीन दिवस 'अवकाळी'चे संकट, 'यलो अलर्ट' जारी

१९९९ नंतर...

गोव्यात सॅफ स्पर्धा होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी फातोर्डा येथे १९९९ मध्ये पुरुषांची सॅफ करंडक स्पर्धा झाली होती आणि तेव्हा यजमान भारताने बांगलादेशला नमवून विजेतेपद पटकावले होते. गोव्यात यंदा चार वर्षांनंतर बहुराष्ट्रीय प्रमुख स्पर्धा होत आहे. २०१७ मध्ये १७ वर्षांखालील पुरुष विश्वकरंडक स्पर्धेतील, तर २०२२ मध्ये १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धेतील फातोर्डा येथे झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com