Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना नुकताच लॉर्ड्सवर खेळला गेला, ज्यात यजमान इंग्लंडने 22 धावांनी विजय मिळवला.
India vs England 3rd Test
Jitesh SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना नुकताच लॉर्ड्सवर खेळला गेला, ज्यात यजमान इंग्लंडने 22 धावांनी विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी भारतीय संघाचा आणि आरसीबीचा (RCB) यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्मा लॉर्ड्स स्टेडियमवर पोहोचला होता, पण तिथे त्याच्यासोबत काहीतरी अनपेक्षित घडले. स्टेडियमबाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला आत जाण्यापासून रोखले.

जितेश शर्माला लॉर्ड्स स्टेडियममध्ये रोखले!

क्रिकेटमधून ब्रेक मिळाल्यानंतर जितेश शर्मा सध्या परदेशात प्रवास करत आहे. याच प्रवासात तो नुकताच लंडनमध्ये पोहोचला होता. जितेश जेव्हा लॉर्ड्स स्टेडियमबाहेर पोहोचला, तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांनी त्याला स्टेडियममध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. जितेशने तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले की, तो एक भारतीय क्रिकेटपटू आहे आणि त्याने टीम इंडियासाठी सामने खेळले आहेत. त्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी त्याचे ऐकले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

India vs England 3rd Test
India vs England, 4th Test: टीम इंडियाचा मायदेशात सलग 17 वा मालिका विजय, विराटनेही केलं रोहित ब्रिगेडचं अभिनंदन

दिनेश कार्तिकमुळे जितेशला लॉर्ड्समध्ये एन्ट्री मिळाली!

या सर्व गोंधळादरम्यान, या कसोटी मालिकेत इंग्लंडमध्ये (England) समालोचन करत असलेला दिनेश कार्तिक फोनवर बोलण्यासाठी स्टेडियमबाहेर आला. जितेशने या वेळी कार्तिकला बोलावण्याचा प्रयत्न केला, मात्र आजूबाजूला जास्त गर्दी असल्यामुळे कार्तिकचे लक्ष त्याच्याकडे गेले नाही. यानंतर जितेशने कार्तिकला फोन करुन स्टेडियमबाहेर बोलावले. इतक्या प्रयत्नांनंतर जितेशला अखेर लॉर्ड्स स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला.

India vs England 3rd Test
IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाने षटकारांच्या बाबतीत रचला इतिहास, 50 वर्ष जुना विक्रम काढला मोडीत

आयपीएल 2025 मधील जितेश शर्माची कामगिरी

जितेश शर्मा आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी (RCB) खेळला होता. या हंगामात आरसीबीला पहिले आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सला (PBKS) हरवले होते. या हंगामात जितेशने 15 सामन्यांत 261 धावा केल्या, ज्यात त्याचा स्ट्राइक रेट 176.35 होता. 2013 मध्ये भारतासाठी पदार्पण केल्यापासून, जितेशने आतापर्यंत 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्याने 100 धावा केल्या आहेत. त्याने अद्याप भारतासाठी (India) वनडे किंवा कसोटीमध्ये पदार्पण केलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com