Rajmata Jijabai Karandak: गोव्याने गुजरातला हरवले! करिष्माचा मौल्यवान गोल; मुख्य फेरीतील जागा पक्की
पणजी: आघाडी फळीतील अनुभवी करिष्मा शिरवईकर हिने उत्तरार्धात नोंदविलेला गोल गोव्यासाठी मौल्यवान ठरला. त्या बळावर त्यांनी राजमाता जिजाबाई करंडक ३०व्या राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल स्पर्धेच्या ह गटात सलग तिसरा विजय नोंदवून मुख्य फेरीतील जागा पक्की केली.
गोव्याने यजमान गुजरातला १-० फरकाने निसटते हरविले. सामना भावनगर येथे झाला. निर्णायक गोल करिष्मा हिने ६६व्या मिनिटास केला. तिचा हा तीन सामन्यांतील चौथा गोल ठरला.
त्यानंतर ७७व्या मिनिटास गोव्याच्या सुश्मिता जाधव हिला रेड कार्ड दाखविण्यात आले. एक खेळाडू कमी होऊनही गोव्याने आघाडी निसटू दिली नाही. स्पर्धेतील सलग तिसऱ्या विजयामुळे गोव्याचे ह गटात सर्वाधिक नऊ गुण झाले.
अगोदरच्या लढतीत त्यांनी महाराष्ट्राला ४-१ असे, तर मध्य प्रदेशचा ६-० असा फडशा पाडला होता. तीन सामन्यांत गोव्याने ११ गोल नोंदविले, तर फक्त एक गोल स्वीकारला. गुजरातला पहिला पराभव स्वीकारावा लागला. अगोदरच्या दोन विजयांमुळे त्यांचे सहा गुण व गटातील दुसरा क्रमांक कायम राहिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.