गोव्यात विभागीय बॅडमिंटन अकादमीची निर्मिती आणि त्या माध्यमातून राज्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन केंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव राज्य बॅडमिंटन असोसिएशनने भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या आमसभेत सादर केला. वार्षिक सर्वसाधारण सभा आसाममधील गुवाहाटी येथे झाली.
गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील व सचिव प्रवीण शेणॉय यांनी राष्ट्रीय संघटनेच्या आमसभेत भाग घेतला. आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आमसभेचे अध्यक्षपद भूषविले.
बीडब्ल्यूएफ जागतिक सीनियर्स (मास्टर्स) बॅडमिंटन स्पर्धा २०२५ किंवा २०२६ साली गोव्यात घेण्यासाठी राज्य संघटना इच्छुक आहे.
गोवा सरकारही अनुकूल आहे. या अनुषंगाने डॉ. सरमा यांनी गोवा सरकारसमवेत सल्लागार पातळीवर बैठका घेण्याची शिफारस केली.
गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांनी मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्याशीही राज्यातील बॅडमिंटनमधील पायाभूत प्रशिक्षण आणि गुणवत्तेची जोपासना याविषयी चर्चा केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.