Tiatr Academy Of Goa: कोंकणी कांतारांच्‍या स्‍पर्धेत ॲनले बार्बोझा व साथी प्रथम
Tiatr Academy Of GoaDainik Gomantak

Tiatr Academy Of Goa: कोंकणी कांतारांच्‍या स्‍पर्धेत ॲनले बार्बोझा व साथी प्रथम

Tiatr Academy Of Goa: ‘तियात्रांचाे दर्जो’ या गीताला पहिले तर पेद्रू वाझ यांना ‘उदक’ या गीताला दुसरे बक्षिस प्राप्‍त झाले अाहे.
Published on

गोवा तियात्र अकादमीने आयोजित केलेल्‍या ‘कातांरांचें दायज’ या स्‍पर्धेत १६ वर्षाखालील कनिष्‍ठ गटात ॲनले बार्बोझा आणि तिच्‍या साथी संघाला कोरल गीत गटात पहिले बक्षीस प्राप्‍त झाले आहे. ॲनले बार्बोझा हिने यापूर्वीही कोकणी गीत गायन स्‍पर्धेत अनेक बक्षिसे प्राप्‍त केली आहेत.

ॲनले बार्बोझा हिने या स्‍पर्धेत ‘कोंकणी भास’ हे गीत सादर केले होते. तिच्‍याबरोबर ज्‍योराह क्रूझ, स्‍टेशा मिरांडा आणि हेल रॉड्रीगीस यांनी या गीतात भाग घेतला होता. एबीयल बॉर्जिस यांच्‍या गटाने सादर केलेल्‍या ‘पुढे पावल मार’ या गीताला दुसरे बक्षिस प्राप्‍त झाले आहे.

कनिष्‍ठ गटात उत्‍कृष्‍ट गीत रचनेचे पहिले बक्षिस सुकूर द सांताक्रूझ यांना ‘ग्‍लोबल वर्मिंग’ या गीतासाठी तर तिसरे बक्षिस मार्कुस डिकुन्‍हा यांना ‘बोदमास मुनीस जात’ या गीताला प्राप्‍त झाले आहे.

Tiatr Academy Of Goa: कोंकणी कांतारांच्‍या स्‍पर्धेत ॲनले बार्बोझा व साथी प्रथम
Goa Accident: रस्त्यात आलेल्या गायीला धडकला अन् जीव गमावून बसला Video

१६ वर्षावरील वरिष्‍ठ गटात उत्‍कृष्‍ट गीत लेखनासाठी पीटर कामिलो यांना ‘तियात्रांचाे दर्जो’ या गीताला पहिले तर पेद्रू वाझ यांना ‘उदक’ या गीताला दुसरे बक्षिस प्राप्‍त झाले अाहे. ही स्‍पर्धा कला व संस्‍कृती खात्‍याच्‍या साैजन्‍याने आयोजित करण्‍यात आली हाेती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com