Professional League 2024: 'धेंपो क्लब'चा निसटता पराभव! सलग सहाव्या विजयासह 'स्पोर्टिंग द गोवा' अग्रस्थानी

Professional Football League 2024: गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवाने भरपाई वेळेतील गोलमुळे प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी सलग सहाव्या विजयाची नोंद करून अग्रस्थान मिळविले.
Professional Football League 2024
football 2.jpgDainik Gomantak
Published on
Updated on

Professional Football League 2024

पणजी: गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवाने भरपाई वेळेतील गोलमुळे प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी सलग सहाव्या विजयाची नोंद करून अग्रस्थान मिळविले. एला-जुने गोवे येथील मैदानावर त्यांनी धेंपो स्पोर्टस क्लबला २-१ फरकाने निसटते हरविले.

कुणाल कुंडईकर याने ४५+१ व्या मिनिटास स्पोर्टिंग क्लबचे गोलखाते उघडले, नंतर बदली खेळाडू सेईगौमांग डौंगल याने ६३व्या मिनिटास धेंपो क्लबसाठी बरोबरीचा गोल केला. ९०+७ व्या मिनिटास डॉयल अल्वेस याने केलेल्या गोलमुळे स्पोर्टिंगला विजयी घोडदौड कायम राखता आली. सहाही सामने जिंकल्यामुळे त्यांचे आता १८ गुण झाले आहेत. स्पर्धेतील दुसऱ्या पराभवानंतर धेंपो क्लबचे सात लढतीतून १५ गुण कायम राहिले.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर पणजी फुटबॉलर्सने दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबला त्यांनी २-२ असे गोलबरोबरीत रोखले. पीटर कार्व्हालो याने ११व्या, तर जॉयविन कॉस्ता याने ३१व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे गार्डियन एंजल क्लबने आघाडी प्राप्त केली, मात्र ३४व्या मिनिटास ऑस्विन रॉड्रिग्जला थेट रेड कार्ड दाखविण्यात आल्यानंतर गार्डियन एंजलचा एक खेळाडू कमी झाला.

Professional Football League 2024
गोव्यात आणखी एक घोटाळा! 'प्रदूषण मंडळा'च्या नावावर अनेकांना गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण

शाविझ पठाण याने ७०व्या मिनिटास पिछाडी कमी केल्यानंतर बदली खेळाडू सतीश काणकोणकर याने ९०+३ व्या मिनिटास गोल नोंदवून पणजी फुटबॉलर्सला सलग पाच पराभवांनंतर पहिला गुण प्राप्त करून दिला. गार्डियन एंजल क्लबचे सात लढतीतून पाच गुण झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com