VIDEO: BBL सामन्यात खळबळ! पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्सच्या मॅचदरम्यान स्टेडियमला आग; थरारक व्हिडिओ व्हायरल

Perth Stadium Fire Video:ऑस्ट्रेलियात सध्या सुरु असलेल्या 'बिग बॅश लीग' (BBL 2025-26) मधील क्वालिफायर सामन्यादरम्यान असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला.
Perth Stadium Fire Video
Perth Stadium Fire VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Perth Stadium Fire: क्रिकेटच्या मैदानात खेळाडू आणि प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात असतो, मात्र कधीकधी अशा काही घटना घडतात ज्याने संपूर्ण क्रीडाविश्व हादरुन जाते. ऑस्ट्रेलियात सध्या सुरु असलेल्या 'बिग बॅश लीग' (BBL 2025-26) मधील क्वालिफायर सामन्यादरम्यान असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. पर्थ स्टेडियमवर पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्स या बलाढ्य संघांमध्ये बाद फेरीचा सामना सुरु असताना स्टेडियममध्ये अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

विशेष म्हणजे, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझम आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ हे दोन्ही दिग्गज मैदानावर उपस्थित होते.

या महत्त्वाच्या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 14 षटकांत 5 गडी गमावून 101 धावा केल्या होत्या. 15व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पर्थचा फलंदाज लॉरी इव्हान्स केवळ 5 धावा करुन बाद झाला आणि तो पॅव्हेलियनकडे परतत असतानाच कॅमेऱ्यात एक भयानक दृश्य कैद झाले. स्टेडियमच्या पाठीमागच्या भागातून काळ्या धुराचे लोट आकाशात उंच उठताना दिसू लागले. टीव्हीवर थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षकांना आणि स्टेडियममधील हजारो चाहत्यांना सुरुवातीला काहीच समजले नाही. मैदानात खेळाडू सुद्धा हे दृश्य पाहून थक्क झाले आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली.

Perth Stadium Fire Video
Virat Kohli: 'किंग कोहली'चा धमाका! विश्वविक्रमापासून विराट आहे फक्त 'इतक्या' धावा दूर; दिग्गजांचे रेकॉर्ड धोक्यात

धुराचे लोट दिसताच स्टेडियमच्या छतावर तैनात असलेल्या पोलिसांनी तातडीने ज्या ठिकाणाहून धूर येत होता त्या दिशेने धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने पाहणी केली असता, स्टेडियमच्या बाहेरील एका भागात आग लागल्याचे निदर्शनास आले.

सुदैवाने ही आग (Fire) स्टेडियमच्या अंतर्गत भागात पोहोचण्यापूर्वीच अग्निशमन दलाने आणि सुरक्षा यंत्रणांनी त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. बिग बॅश लीगने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून तो काही वेळातच जगभरात व्हायरल झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, मात्र एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अशा प्रकारची चूक झाल्याने स्टेडियमच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Perth Stadium Fire Video
Virat Kohli: विराट कोहलीची अचानक माघार! न्यूझीलंडविरूध्दच्या वनडे मालिकेपूर्वी चाहत्यांना धक्का

या थरारक घटनेनंतर सामना पुन्हा सुरु झाला. पर्थ स्कॉर्चर्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 147 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर फिन ॲलनने 49 धावांची खेळी करत संघाला सावरले, मात्र त्याचे अर्धशतक अवघ्या एक धावेने हुकले. कर्णधार ॲश्टन टर्नरने 29 धावांचे योगदान दिले. विजयासाठी 148 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सिडनी सिक्सर्सचा संघ पर्थच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे पत्त्यासारखा कोसळला. बाबर आझम आणि स्टीव्ह स्मिथ सारखे अनुभवी खेळाडू संघात असूनही सिडनीचा पूर्ण संघ अवघ्या 99 धावांवर गारद झाला. या विजयासह पर्थ स्कॉर्चर्सने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला, तरीही मैदानावरील आगीच्या घटनेची चर्चा निकालापेक्षा जास्त रंगली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com