
इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 53 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॅट कमिन्सने आपला निर्णय बरोबर असल्याचे सिद्ध करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. त्याने पॉवरप्लेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि दिल्लीच्या फलंदाजीला गुडघे टेकवण्यास भाग पाडले. कमिन्सने सलग तीन षटकांत तीन विकेट्स घेतल्या. एवढेच नाहीतर त्याने प्रत्येक षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक विकेट घेतली.
दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) डावाच्या पहिल्याच चेंडूवर पॅट कमिन्सने करुण नायरला बाद केले. यानंतर तो तिसरे षटक टाकण्यासाठी आला. या षटकातही त्याने पहिल्याच चेंडूवर फाफ डु प्लेसिसच्या रुपात विकेट घेतली. त्यानंतर कमिन्स डीसीच्या डावातील पाचवे षटक टाकण्यासाठी आला. त्या षटकाच्याही पहिल्याच चेंडूवर त्याने अभिषेक पोरेलला पायचीत आऊट केले. असे करुन कमिन्सने सलग तीन षटकांत तीन विकेट्स घेतल्या.
अशाप्रकारे, आयपीएल सामन्यात पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स घेणारा तो पहिला कर्णधार बनला. त्याच्या आधी कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करता आली नाही. त्याने सामन्यात चार षटके टाकली आणि 19 धावा देऊन तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
पॅट कमिन्स व्यतिरिक्त, हर्षल पटेलने पॉवरप्लेमध्ये अक्षर पटेलची विकेट घेतली. अशाप्रकारे, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पॉवर प्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला चार विकेट गमावून फक्त 26 धावा करता आल्या. दिल्लीच्या फलंदाजांनी खूपच खराब कामगिरी केली. संघाकडून ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी प्रत्येकी 41 धावांची सर्वाधिक खेळी केली, परंतु या दोघांना इतर खेळाडूंकडून साथ मिळाली नाही, त्यामुळे दिल्लीचा संघ केवळ 133 धावाच करु शकला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.