पणजी: मास्टर्स टेबल टेनिस चँपियन्स लीगच्या (एमटीटीसीएल) चौथ्या आवृत्तीची सुरवात रविवारी (ता. १८) पेडे-म्हापसा येथील बहुउद्देशीय स्टेडियममध्ये होणार आहे.
पेडे स्पोर्ट्स क्लबद्वारे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत १२ कॉर्पोरेट संघ आणि ८४ खेळाडू सहभागी होणार आहेत. एकूण १ लाख रुपये बक्षीस रक्कम स्पर्धेसाठी आहे. विजेत्या संघाला ५०,००० रुपये, उपविजेत्याला ३०,००० रुपये आणि उपांत्य फेरीतील दोन्ही संघांना प्रत्येकी १०,००० रुपये बक्षीस दिले जाईल. गोव्यातील प्रमुख मास्टर्स खेळाडू कौशल्य प्रदर्शित करतील.
या स्पर्धेचे उदघाटन १८ रोजी सकाळी ९ वाजता गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गोवा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष सुदिन वेरेकर, हळदोणे मतदारसंघाचे माजी आमदार ग्लेन तिकलो, पेडे स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मयूर सावकार आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.
यंदाच्या स्पर्धेत बुर्ये एंटरप्रायझेस, विकी १०, दिया एंटरप्रायझेस, एस्टिलो लीजेंड्स, एम अँड एस टायटन्स, सुझुकी-बी.एन. ठाकूर, पर्रिकर स्मॅशर्स, टफ सेक्युरिटी सर्व्हिसेस, रॉयल रुबी, वाय एस धेंपो मॅव्हेरिक्स, यूके अल्ट्रा आणि डिवाइन एंजल्स या १२ कॉर्पोरेट संघांचा शानदार समावेश आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.