Goa Sports: पेडे-म्हापसा केंद्राची जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी; पाच स्पर्धा विक्रमांची नोंद

State Level Swimming Competition: राज्यस्तरीय स्पर्धेत २२ सुवर्णांसह एकूण ५४ पदकांची कमाई
State Level Swimming Competition: राज्यस्तरीय स्पर्धेत २२ सुवर्णांसह एकूण ५४ पदकांची कमाई
35th State Level Swimming Competition at ponda Dainik Gomantak

पेडे-म्हापसा जलतरण केंद्राने ३५व्या राज्यस्तरीय सबज्युनियर-ज्युनियर जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदविली. जेरी डिमेलो यांच्या मार्गदर्शनाखालील या केंद्रातील जलतरणपटूंनी २२ सुवर्ण, १८ रौप्य व १४ ब्राँझसह एकूण ५४ पदके जिंकली. शिवाय पाच स्पर्धा विक्रमांची नोंद केली. स्पर्धा फोंडा जलतरण तलावात झाली.

पदक विजेते ः मुलगे गट एक ः ओजस कारापूरकर (२ सुवर्ण, ४ रौप्य, १ ब्राँझ), राघव टोपले (४ सुवर्ण, १ रौप्य, २ ब्राँझ), मुली गट दोन ः विरीत्ती वेर्णेकर (२ सुवर्ण, ३ रौप्य, १ ब्राँझ), आयव्ही डिसोझा (१ ब्राँझ, १ रौप्य), मुलगे गट तीन ः आर्यन मांद्रेकर (२ सुवर्ण, २ रौप्य, २ ब्राँझ), मुली गट तीन ः माधुर्या मोरजकर (४ सुवर्ण-२ स्पर्धा विक्रम, २ रौप्य, १ ब्राँझ), राचेल डिसोझा (२ सुवर्ण, १ रौप्य, २ ब्राँझ), एकता मांद्रेकर (२ सुवर्ण, २ रौप्य, १ ब्राँझ), मुलगे गट चार ः कविश परब (३ सुवर्ण-तिन्ही स्पर्धा विक्रमासह, २ रौप्य, २ ब्राँझ), लहान गट ः मिशेला डिकॉस्ता (१ सुवर्ण).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com