Ethan Vaz: 'एथन' पुन्हा अपराजित! साडेसात गुणांची केली कमाई; टायब्रेकरमध्ये पटकावला सातवा क्रमांक

Manohar Parrikar Open Chess Tournament: गोवा बुद्धिबळ संघटनेने अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने घेतलेली स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झाली.
Ethan Vaz Chess Tournament
Ethan VazDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मध्य प्रदेशचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) आयुष शर्मा याने सर्वाधिक साडेआठ गुणांसह मनोहर पर्रीकर गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या अ गटात विजेतेपद पटकावले.

गोमंतकीय १३ वर्षीय आयएम एथन वाझ (एलो २४१२) सर्व दहाही डावांत अपराजित राहिला. त्याने पाच विजय व पाच बरोबरींसह साडेसात गुणांची कमाई केली. एकूण आठ खेळाडूंसह त्याला संयुक्त तिसरा क्रमांक मिळाला. टायब्रेकर गुणांत त्याला सातवा क्रमांक मिळाला.

रविवारी स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत दुसऱ्या बोर्डवर एथन याने रशियन आयएम अलेक्झांडर स्लिझेव्हस्की (एलो २३४०) याला बरोबरीत रोखले. स्लिझेव्हस्की याचे त्यामुळे आठ गुण झाले व त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. साडेसात गुण झालेल्या किर्गिझस्तानचा आयएम सेमेतेई तोलोगन (एलो २३५१) याला तिसरा क्रमांक मिळाला.

Ethan Vaz Chess Tournament
Chess Tournament: 'मनोहर पर्रीकर’ स्पर्धेत अमेय, एथन, ऋत्विज यांची विजयी सलामी; 23 देशांतील बुद्धिबळपटू सहभागी

गोवा बुद्धिबळ संघटनेने अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने घेतलेली स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झाली. बक्षीस वितरण केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे खजिनदार धर्मेंद्र कुमार, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी, खजिनदार विश्वास पिळर्णकर, उपाध्यक्ष अरविंद म्हामल यांच्या उपस्थितीत झाले. पहिल्या चार स्पर्धकांना अनुक्रमे साडेचार लाख रुपये, साडेतीन लाख रुपये, अडीच लाख रुपये व दोन लाख रुपये बक्षीस मिळाले. स्पर्धेत एकूण २५ लाख रुपये रकमेची बक्षिसे देण्यात आली.

Ethan Vaz Chess Tournament
Goa Chess Tournament: गोव्याचे मास्टर कमाल! अमेय, एथनचे पाच गुण, अनुरागने साधली सलग तिसरी बरोबरी

ऋत्विज, अनुरागचे विजय

स्पर्धेच्या दहाव्या फेरीत गोव्याचा आयएम ऋत्विज परब (एलो २३७१) याने दक्षिण रेल्वेचे प्रतिनिधित्व करणारा आयएम के. रत्नाकरन याला पराभूत केले. सहा विजय, एक बरोबरी व तीन पराभवांसह त्याचे साडेसहा गुण झाले. त्याला २७वा क्रमांक मिळाला.

ग्रँडमास्टर अनुराग म्हामल (एलो २४९९) याने अखेरच्या फेरीत गुजरातच्या नैतिक मेहता याला हरविले. चार विजय, चार बरोबरी व दोन पराभवांसह अनुरागचे सहा गुण झाले. त्याला ४१वा क्रमांक प्राप्त झाला.

आयएम अमेय अवदी (एलो २४२२) याला अखेरच्या फेरीत तमिळनाडूचा आयएम एस. नितीन याने हरविले. त्यामुळे त्याचे सहा गुण कायम राहिले. अमेयने पाच विजय, दोन बरोबरी व तीन पराभवांसह ३४वा क्रमांक मिळविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com