Karun Nair: 6,6,4,4 .. करुण नायरचे तुफान! नाबाद दीडशतक; गोवा संघाचा पराभव

Goa Cricket: करुण नायर याचे निर्णायक नाबाद दीडशतक, तसेच त्याने पी. ध्रुव याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी केलेल्या १८१ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे गोव्याला नमते घ्यावे लागले.
Karun Nair
Karun NairDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कसोटीपटू करुण नायर याचे निर्णायक नाबाद दीडशतक, तसेच त्याने पी. ध्रुव याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी केलेल्या १८१ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे गोव्याला नमते घ्यावे लागले. यजमान कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) सचिव संघाने सामना सहा विकेटने जिंकून डॉ. (कॅप्टन) के. थिम्माप्पिया स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

चार दिवसीय सामना अळूर येथे झाला. सामन्याच्या अखेरच्या चौथ्या दिवशी बुधवारी गोव्याचा दुसरा डाव तिसऱ्या दिवसअखेरच्या ८ बाद १६८ वरून २०२ धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावातील ६२ धावांच्या आघाडीमुळे गोव्याने केएससीए सचिव संघासमोर विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य ठेवले.

त्यांनी ४ विकेटच्या मोबदल्यात २६६ धावा करून सामना जिंकला. प्रतिस्पर्ध्यांची ४ बाद ८५ अशी स्थिती असताना गोव्याला अंतिम फेरी खुणावत होती; पण करुण नायरने गोव्याच्या आशांवर पाणी फेरले. मागील इंग्लंड दौऱ्यात भारतीय कसोटी संघात पुनरागमन केलेल्या अनुभवी करुणने नाबाद १५१ धावा करताना १६९ चेंडूंतील खेळीत १२ चौकार व २ षटकार मारले. त्याला ध्रुव याची संयमी साथ लाभली. त्याने १०२ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ६५ धावा केल्या.

Karun Nair
Thimmappiah Tournament: ..पुन्हा तेंडुलकरने सावरले! गोव्याच्या फलंदाजांची घसरगुंडी; द्विशतकी आघाडीमुळे स्थिती भक्कम

गोवा, पहिला डाव : ३३८ व दुसरा डाव (८ बाद १६८ वरून) : ८९.२ षटकांत सर्वबाद २०२ (अर्जुन तेंडुलकर ३८, समर दुभाषी ३१, वासुकी कौशिक नाबाद ४, अभिषेक अहलावत ५-७४, माधव बजाज ३-६८, पी. ध्रुव २-२८) पराभूत वि. केएससीए सचिव संघ, पहिला डाव : २७६

Karun Nair
Thimmappiah Tournament: ‘तेंडुलकर’ने बाद केले ‘द्रविड’ला! गोवा महत्त्वपूर्ण आघाडीच्या वाटेवर; 2 विकेट्सची गरज

दुसरा डाव : ६६.४ षटकांत ४ बाद २६६ (लोचन गौडा १३, निकिन जोस १३, फैझान खान १९, करुण नायर नाबाद १५१, समीत द्रविड ३, पी. ध्रुव नाबाद ६५, अर्जुन तेंडुलकर ५-२-७-०, वासुकी कौशिक १२-४-३०-०, मोहित रेडकर १६-१-८२-१, दर्शन मिसाळ २३.४-२-१०६-३, ललित यादव ९-०-३६-०, अभिनव तेजराणा १-०-५-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com