Joshua Pinto: अभिमानास्पद! कळंगुटच्या 'जोशुआ'ची भारतीय बास्केटबॉल संघात निवड! जर्मनीतील FISU मध्ये करणार प्रतिनिधित्व

Joshua Pinto Indian basketball team: जोशुआ हा गोव्यातील हुकमी बास्केटबॉलपटू असून त्याने राज्यस्तरीय, तसेच राष्ट्रीय पातळीवर सातत्याने छाप पाडली आहे.
Basketball India
Joshua Remedios Pinto basketball IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नाईकवाडो-कळंगुट येथील जोशुआ दोस रेमेडियस पिंटो याची भारतीय बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. तो जर्मनीत होणाऱ्या प्रतिष्ठेच्या एफआयएसयू जागतिक विद्यापीठ स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करेल. स्पर्धा १६ ते २७ जुलै या कालावधीत खेळली जाईल.

जोशुआ हा गोव्यातील हुकमी बास्केटबॉलपटू असून त्याने राज्यस्तरीय, तसेच राष्ट्रीय पातळीवर सातत्याने छाप पाडली आहे. तो राष्ट्रीय सीनियर पातळीवर गोव्याच्या संघाचा कर्णधार आहे. गतमोसमात झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेत त्याने राजस्थानमधील कोटा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते.

Basketball India
Goa Ranji Team: गोवा संघाकडून खेळणार कर्नाटकचा धाकड गोलंदाज, वेगवान माऱ्यासाठी पाचारण; 'एलिट' सामन्यांत होणार फायदा

या विद्यापीठातर्फे खेळताना जोशुआ २०२३ मध्ये खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदकाचा, २०२४ मध्ये अखिल भारतीय विद्यापीठ ३ बाय ३ बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी ठरला. यावर्षी झालेल्या भारतीय राष्ट्रीय बास्केटबॉल लीग (आयएनबीएल) २५ वर्षांखालील स्पर्धेत त्याची दिल्ली ड्रिबलर्स संघात निवड झाली होती.

Basketball India
National Para Athletics Championship: गोव्याची साक्षी चमकली! 23व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत केली 'सुवर्ण' कामगिरी

गोवा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष शेन डायस, सचिव परिंद नाचिनोळकर यांनी जागतिक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल जोशुआ याचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com