National Para Athletics Championship: गोव्याची साक्षी चमकली! 23व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत केली 'सुवर्ण' कामगिरी

Goa's Para Athlete Sakshi Kale Wins Gold: गोव्याची अग्रणी पॅरा ॲथलीट साक्षी काळे हिने लौकिक कायम राखताना २३व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत टी-१२ प्रकारात वेगवान महिला धावपटूचा मान मिळविला.
Goa's Para Athlete Sakshi Kale Wins Gold
Goa's Para Athlete Sakshi Kale Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa's Para Athlete Sakshi Kale Wins Gold at 23 National Para Athletics Championship

पणजी: गोव्याची अग्रणी पॅरा ॲथलीट साक्षी काळे हिने लौकिक कायम राखताना २३व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत टी-१२ प्रकारात वेगवान महिला धावपटूचा मान मिळविला. चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेत साक्षीने दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले.

साक्षी हिला महिलांच्या १०० मीटर, २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम, तर लांब उडीत दुसरा क्रमांक मिळाला. तिने दृष्टिदोष खेळाडूंच्या गटातील महिलांत वेगवान धावपटूचा मान मिळविताना १०० मीटर स्प्रिंट १४.६१ सेकंद वेळेत पूर्ण केले. या शर्यतीत दिल्लीच्या सिद्रा मुस्कान हिला रौप्य, तर ओडिशाच्या जानकी ओरम हिला ब्राँझपदक मिळाले.

Goa's Para Athlete Sakshi Kale Wins Gold
National Para Athletics Championship: गोव्याच्या साक्षीला पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, ब्राँझपदक

उसगाव येथील साक्षीने गतवर्षी जानेवारी गोव्यातील बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर झालेल्या २२व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेतही पदके जिंकली होती. तेव्हा तिला लांब उडीत सुवर्ण, तर १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ब्राँझपदक मिळाले होते. त्यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये साक्षी हिने नवी दिल्लीत झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये दोन पदके जिंकली होती. यामध्ये १०० मीटरमधील ब्राँझ, तर लांब उडीत रौप्यपदक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com