ISL 2026: एफसी गोवाचा कल संघातील नव्या चेहऱ्यांकडे, ओडिशाविरुद्ध संघ बदलांचे मार्केझ यांच्याकडून संकेत

FC Goa vs Odisha FC ISL 2026: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात सध्या मध्यक्रमात असलेल्या एफसी गोवा संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी बाकी सामन्यांत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत दिले.
ISL 2026
ISL 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात सध्या मध्यक्रमात असलेल्या एफसी गोवा संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी बाकी सामन्यांत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत गुरुवारी दिले. त्यामुळे शुक्रवारी (ता. १०) ओडिशा एफसीविरुद्धच्या लढतीत संघात बदलांची अपेक्षा आहे.

एफसी गोवा व ओडिशा एफसी यांच्यातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. मागील

लढतीत बंगळूर एफसीविरुद्ध फातोर्डा येथेच दोन गोलने पराभूत झालेल्या एफसी गोवा संघाला ओडिशा एफसीकडून कडवे आव्हान अपेक्षित आहे. एफसी गोवाचे सध्या सात लढतीतून १० गुण असून ओडिशा एफसीने पाच लढतीतून पाच गुणांची कमाई केली आहे. गोव्यात येण्यापूर्वी टी. जी. पुरुषोत्तमन यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला मुंबई सिटी एफसीकडून एका गोलने निसटता पराभव पत्करावा लागला होता.

बंगळूरविरुद्धच्या पराभवाविषयी मार्केझ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले, ‘‘आकडेवारीत आमची कामगिरी चांगली असली, तरी आम्ही चेंडूवर नियंत्रण राखण्यात कमी पडलो. प्रतिस्पर्धी संघ अनुभवी व बलाढ्य होता, तरीही आम्ही सुरवातीलाच गोल स्वीकारल्यानंतर पिछाडीवर राहिलो, त्यातून सावरताच आले नाही.’’ ओडिशाविरुद्धच्या लढतीविषयी ५७ वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शक म्हणाले, ‘‘ओडिशा एफसीचे प्रशिक्षक चतूर आहे, त्यांच्या खेळाडूंचाही जम बसलेला आहे, त्यामुळे आम्हाला कडवी लढत अपेक्षित आहे. बचावात्मकदृष्ट्या विचार करता ओडिशा एफसीची कामगिरी उल्लेखनीय आहे. या संघाने स्पर्धेसाठी तयारी उशिरा सुरू केली, तरीही स्पृहणीय प्रगती साधलेली आहे.’’

ISL 2026
Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा वाढला! पारा 34 अंशांवर, घामाच्या धारांनी गोवेकर हैराण

यावेळच्या १३ सामन्यांच्या स्पर्धेतील एकंदरीत वातावरण विसंगत आहे. एफसी गोवाने मागील पराभवातून सावरताना सरावात मेहनत घेत संयम बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांना वाटते. शुक्रवारच्या लढतीत सामन्याच्या सुरवातीस गोल करणाऱ्या संघाचे पारडे वरचढ राहील, असेही त्यांनी नमूद केले.

संघातील नवोदित खेळाडूंवर विश्वास

मार्केझ यांनी एफसी गोवा संघातील नवोदित खेळाडूंवर विश्वास प्रकट केला. स्पर्धेतील एफसी गोवाचे अजून सहा सामने बाकी आहेत, त्यामुळे भविष्याचा विचार करून नव्या खेळाडूंना संधी देण्याबाबतचे विचार त्यांच्या मनात घोळत आहे. याविषयी मार्केझ म्हणाले, की ‘‘खेळाडूंना संधी देणे जास्त महत्त्वाचे आहे. नव्या खेळाडूंसह आम्ही जिंकूही शकतो. जर मी या खेळाडूंना आता निवडले, तर एफसी गोवाच्या भविष्याचा विचार करून या खेळाडूंची क्षमता पाहणे शक्य होईल.’’ त्यांनी दिलेल्या संकेतानुसार, ओडिशाविरुद्ध एफसी गोवा संघात महत्त्वाचे बदल होऊ शकतात, नवे खेळाडू संघात येऊ शकतात.

ISL 2026
Goa Crime: टँकर चालकावर जुन्या मालकाकडून खुनी हल्ला! पणजीतील प्रकार; संशयित समीर खानला अटक

मैदानात उतरण्यापूर्वी...

एफसी गोवा ः ७ सामने, २ विजय, ४ बरोबरी, १ पराभव, ६ गोल केले, तर ५ गोल स्वीकारले, १० गुण

ओडिशा एफसी ः ५ सामने, १ विजय, २ बरोबरी, २ पराभव, ६ गोल केले, ८ गोल स्वीकारले, ५ गुण

गतमोसमात ः २ सामन्यांत एफसी गोवाचे विजय

४ जानेवारी २०२५ रोजी भुवनेश्वर येथे एफसी गोवाचा ४-२ असा विजय

६ फेब्रुवारी २०२५ रोजी फातोर्डा येथे एफसी गोवा २-१ फरकाने विजयी

आयएसएलमध्ये ः २४ सामने, एफसी गोवा विजयी - १५, ओडिशा एफसी विजयी - ३, बरोबरी - ६

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com