ISL 2026: 2 मिनिटे बाकी असताना गेलेला सामना बचावला! कर्णधार ठरला संकटमोचक; FC Goa चेन्नईयीन सामन्यात गोलबरोबरी

FC Goa Vs Chennaiyin FC: एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना चेन्नईयीन एफसीला १-१ असे गोलबरोबरीत रोखले.
FC Goa Vs Chennaiyin FC
FC Goa Vs Chennaiyin FCDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कर्णधार संदेश झिंगन रविवारी चेन्नई येथे एफसी गोवासाठी संकटमोचक ठरला. भारताच्या या आंतरराष्ट्रीय बचावपटूचे सामन्यातील दोन मिनिटे बाकी असताना अप्रतिम हेडिंग ठरले आणि एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना चेन्नईयीन एफसीला १-१ असे गोलबरोबरीत रोखले.

चेन्नईयीन एफसीचा आयएसएल स्पर्धेतील यंदाचा हा घरच्या मैदानावरील पहिलाच सामना होता. गोलशून्य पूर्वार्धानंतर ४८व्या मिनिटास एफसी गोवाच्या साहील ताव्होरा याची चूक यजमान संघाच्या पथ्यावर पडली. साहील चेंडू पासिंग करताना चुकला.

त्याचा लाभ बदली खेळाडू इरफान यादवड याने घेतला. त्याने एफसी गोवाचा गोलरक्षक ऋतिक तिवारी याला असाह्य ठरवत चेन्नईयीन एफसीला एका गोलची आघाडी मिळवून दिली. वर्चस्व राखलेला क्लिफर्ड मिरांडा यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसी संघ घरच्या मैदानावर जिंकण्याच्या स्थितीत असताना ८८व्या मिनिटास सर्बियन देयान द्राझिच याचा कॉर्नर फटका लाजवाब ठरला.

FC Goa Vs Chennaiyin FC
ISL 2026: "..नुकसान सोसावे लागेल", चेन्नईयीनविरुद्धच्या सामन्यापूर्वी FC Goaचे प्रशिक्षक मार्केझनी दिला इशारा; गोलबाबत व्यक्त केली खंत

संदेशने चेन्नईयीनच्या खेळाडूंपेक्षा उंच उडी घेत चेंडूला हेडिंगने अचूक दिशा दाखविली, यावेळी प्रतिस्पर्धी गोलरक्षक महंमद नवाज याला चेंडू रोखण्याची संधीच मिळाली नाही. या गोलमुळे एफसी गोवास आयएसएल मोसमातील पहिला पराभव टाळणे शक्य झाले. एफसी गोवाची ही स्पर्धेतील सलग तिसरी, तर एकंदरीत चौथी बरोबरी ठरली.

FC Goa Vs Chennaiyin FC
Long Distance Relationship Tips: लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात? जोडीदाराशी कनेक्ट होण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या गोष्टी

अन्य दोन विजयांसह त्यांचे सहा सामन्यांतून १० गुण झाले आहेत. चेन्नईयीनला दुसऱ्यांदा स्पर्धेत बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यांचे आता पाच लढतीतून पाच गुण झाले आहेत. एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना आता चार एप्रिल रोजी फातोर्डा येथे बंगळूर एफसीविरुद्ध होईल. चेन्नईयीनची पुढील लढत सात एप्रिल रोजी इंटर काशी संघाविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com