Indian Super League 2024-25
पणजी: एफसी गोवा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या अकराव्या मोसमासाठी सज्ज झाला आहे. त्यांनी संघ जाहीर केला. त्यांचा पहिला सामना १७ सप्टेंबर रोजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जमशेदपूर एफसीविरुद्ध होईल.
स्पॅनिश मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाचा यंदा सलग दुसरा मोसम आहे. गतमोसमात त्यांनी स्पर्धेच्या लीग फेरीत तिसरा क्रमांक मिळविला होता, तसेच करंडकाची उपांत्य फेरीही गाठली होती. गतमोसमात त्यांनी आयएसएलमध्ये एकूण २५ पैकी १४ सामने जिंकले होते. सहा बरोबरी व पाच पराभव पत्करले होते. ४३ गोल नोंदविताना २७ गोल स्वीकारले होते.
२०२४-२५ आयएसएल मोसमासाठी एफसी गोवा संघ ः गोलरक्षक ः लक्ष्मीकांत कट्टीमणी, लारा शर्मा, बॉब जॅक्सन, ह्रतिक तिवारी, बचावपटू ः ओडेई ओनाइंडिया, मुहम्मद हम्माद, निम दोरजी तमांग, सेरिटन फर्नांडिस, संदेश झिंगन, सानाटोंबा सिंग यांगलेम, आकाश संगवान, जय गुप्ता, मध्यरक्षक ः बोरिस सिंग, उदांता सिंग, आयुष छेत्री, ब्रायसन फर्नांडिस, रॉलिन बोर्जिस, मुहम्मद नेमिल, कार्ल मॅकह्यू, बोर्हा हेर्रेरा, साहिल ताव्होरा, लाल्थांगलियाना, व्हेलिंग्टन फर्नांडिस, माल्सॉमत्लुआंगा, देयान द्राझिच, महंंमद यासीर, आघाडीपटू ः ॲलन साजी, इकेर ग्वॉर्रोचेना, आर्मांदो सादिकू.
मुख्य प्रशिक्षक ः मानोलो मार्केझ, साहाय्यक प्रशिक्षक ः गौरमांगी सिंग, तांत्रिक समन्वयक ः बेनिटो फेलिक्स, तंदुरुस्ती प्रशिक्षक ः होजे बार्रोसो, गोलरक्षक प्रशिक्षक ः असियर रे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.