Manolo Marquez: एफसी गोवाचे करंडक जिंकण्याचेच ध्येय! 'आयएसएल'बाबत मार्केझ आशावादी

Indian Super League 2024-25: यंदा चुकांची पुनरावृत्ती टाळत लीग शिल्ड आणि करंडक जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू; प्रशिक्षक मानोलो मार्केझ
Indian Super League 2024-25: यंदा चुकांची पुनरावृत्ती टाळत लीग शिल्ड आणि करंडक जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू; प्रशिक्षक मानोलो मार्केझ
FC Goa Coach Manolo MarquezDainik Gomantak
Published on
Updated on

FC Goa|ISL 2024-25

पणजी: गतमोसमातील दुसऱ्या टप्प्यात काहीवेळा खराब खेळल्याने एफसी गोवास इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शिल्ड, तसेच करंडकाला मुकावे लागले. यंदा चुकांची पुनरावृत्ती टाळत यशस्वी कामगिरी आणि करंडक जिंकण्याचा ध्येय संघाने बाळगले आहे, असे सांगत संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी आगामी मोसमाबाबत आशावादी दृष्टीकोन व्यक्त केला.

आयएसएस स्पर्धेला सुरवात झाली. एफसी गोवाचा मोसमातील पहिला सामना १७ सप्टेंबर रोजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जमशेदपूर एफसीविरुद्ध होईल. त्या पार्श्वभूमीवर एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक, तसेच खेळाडू जय गुप्ता, साहिल ताव्होरा, अल्बानियाचा आर्मांदो सादिकू, आयर्लंडचा कार्ल मॅकह्यू व संघाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी संघाच्या ‘मीडिया डे’मध्ये भाग घेऊन मते व्यक्त केली.

मार्केझ यांनी यावर्षी जुलै महिन्यात भारतीय सीनियर पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले. त्यांच्यापाशी यावेळी दुहेरी जबाबदारी आहे. २०२३-२४ मोसमापासून ते एफसी गोवाचे प्रशिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने गतमोसमात साखळी फेरीत तिसरा क्रमांक, तर करंडकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

५६ वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षक आगामी मोहिमेविषयी म्हणाले, की ‘‘गतमोसमातील काही सामन्यांत विशेषतः दुसऱ्या टप्प्यात खराब खेळल्यामुळे यश हुकले. यंदा चुकांची पुनरावृत्ती टाळत लीग शिल्ड आणि करंडक जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. मोसमपूर्व तयारी चांगली झालेली आहे. आयएसएलमधील अनुभवी नावे संघात आहेत. काही खेळाडू जायबंदी असले, तरी ते योग्यवेळी सज्ज होण्याचे संकेत आहेत. आम्ही आशावादीआहोत.’’

कट्टीमणी एक सर्वोत्तम गोलरक्षक

अर्शदीप सिंग या अनुभवी गोलरक्षकाने आयएसएल तोंडावर असताना सामंजस्याने एफसी गोवा संघ सोडून हैदराबाद एफसीशी करार केला आहे. त्याच्या अनुपस्थितीत संघाचा मुख्य गोलरक्षक कोण असेल या प्रश्नाचे थेट उत्तर मार्केझ यांनी टाळले. ‘‘आमच्याकडे चांगले गोलरक्षक आहेत, त्यापैकी एकजण गोलनेटचे संरक्षण करेल,’’ असे ते म्हणाले. त्याचवेळी आपल्या मार्गदर्शनाखाली भारतातील गोलरक्षकांत लक्ष्मीकांत कट्टीमणी सर्वोत्तम असल्याचे मत मार्केझ यांनी व्यक्त केले. पाच वर्षांनंतर हा अनुभवी गोलरक्षक एफसी गोवा संघात परतला असून या महिन्याच्या सुरवातीस फातोर्डा येथे ओडिशा एफसीविरुद्ध अंतिम लढतीत दोन पेनल्टी फटके अडवून एफसी गोवास भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी जिंकून देण्यात कट्टीमणी याने मोलाचा वाटा उचलला होता.

Indian Super League 2024-25: यंदा चुकांची पुनरावृत्ती टाळत लीग शिल्ड आणि करंडक जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू; प्रशिक्षक मानोलो मार्केझ
ISL 2024-25: आयएसएलचा थरार आजपासून! पहिल्याच सामन्यात मोहन बागान-मुंबई सिटी भिडणार

यावेळची आयएसएल स्पर्धा खडतर

यंदा आयएसएल स्पर्धेत १३ संघ आहेत. त्याविषयी मार्केझ म्हणाले, की ‘‘माझ्यामते यावेळची आयएसएल खूपच खडतर असेल. नवे संघ, संघांची नवी शैली, नव्या खेळाडूंच्या समावेशाने चुरस वाढली आहे. स्पर्धेतील संघांची संख्या वाढत आहे ही भारतीय फुटबॉलसाठी चांगली गोष्ट आहे.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com