Team India
Team IndiaDainik Gomantak

IND-W vs ENG-W: भारतीय पोरींची कमाल! दीप्ती शर्माच्या जाळ्यात अडकले इंग्लिश फलंदाज

IND-W vs ENG-W: भारताने पहिल्या डावात 428 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 136 धावांतच गारद झाला.
Published on

India Women vs England Women Test Match: इंडिया वुमन्स विरुद्ध इंग्लंड वुमन्स यांच्यातील एकमेव कसोटी सामना नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर खेळवला जात आहे. भारताने पहिल्या डावात 428 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 136 धावांतच गारद झाला. इंग्लंडसाठी सर्वोत्कृष्ट स्कोअरर नेट स्कायव्हर ब्रंट होती, तिने 59 धावांची खेळी खेळली. दुसरीकडे, दीप्ती शर्माने पाच विकेट घेतल्या. तर स्नेह राणाने दोन विकेट्स घेतल्या. शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. भारताने दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 160 हून अधिक धावा केल्या. भारताची आघाडी 450 च्या पुढे गेली.

दरम्यान, दुसऱ्या डावात शफाली आणि स्मृती यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी झाली. मंधाना 26 धावा करुन बाद झाली. तर शफालीने 53 चेंडूत 33 धावा केल्या. यास्तिकाला केवळ 9 धावा करता आल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज 29 चेंडूत 27 धावा करुन बाद झाली. दीप्ती शर्मा 20 आणि स्नेह राणा खाते न उघडता बाद झाली.

Team India
IND W vs ENG W: भारतीय महिला संघाने 23 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये जिंकली वनडे मालिका

तत्पूर्वी, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा 67 धावा करुन सोफी एक्लेस्टोनची शिकार झाली. यानंतर एक्लेस्टोनने रेणुका सिंगला बाद करुन भारताला 9वा धक्का दिला. दीप्तीने 113 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या सामन्यातील एकिस्टोनची ही पहिली विकेट होती. पूजा वस्त्राकरला साथ देण्यासाठी आलेली रेणुका अवघी एक धाव काढून बाद झाली. अशा प्रकारे एकलस्टोनने या कसोटी सामन्यात आपली दुसरी विकेट घेतली. राजेश्वरी गायकवाडला बाद करुन एक्लेस्टोनने भारतीय डाव संपवला. अशा प्रकारे भारताने पहिल्या डावात 428 धावा केल्या. एक्लेस्टन आणि लॉरेन बेल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

दुसरीकडे, पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात 410 धावा केल्या होत्या. भारताकडून या सामन्यात चार फलंदाजांनी 50+ धावा केल्या आहेत. नवोदित शुभा सतीश आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी अर्धशतक ठोकले, तर यास्तिका भाटिया आणि दीप्ती शर्मा यांनीही 50+ धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने 49 धावांची खेळी केली. मात्र, ती धावबाद झाली.

Team India
IND W vs ENG W: भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास, T20I फायनलमध्ये इंग्लंडवर मिळवला विजय

दरम्यान, वुमन्स टेस्टमध्ये भारताने एका दिवसात केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती. एकूणच, तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च स्कोअर होता. क्राइस्टचर्च इथे 1935 च्या महिला कसोटीत एका दिवसात 475 धावा झाल्या होत्या. नवोदित शुभा सतीशने 49 चेंडूत अर्धशतक ठोकले, जे भारतासाठी महिला कसोटी क्रिकेटमधील दुसरे सर्वात जलद अर्धशतक होते. पहिल्या क्रमांकावर संगीता डबीर आहे, तिने 1995 मध्ये इंग्लंडविरुद्ध 40 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यावरुन भारतीय संघ सध्या फ्रंटफूटवर असल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com