

Dilip Doshi Died
भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू दिलीप दोशी यांचे निधन झाले आहे. सोमवारी, २३ जून रोजी त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
दिलीप दोशी यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात वयाच्या ३२ व्या वर्षी कसोटी सामन्यांतून केली. ते डावखुरे फिरकी गोलंदाज होते. त्यांनी १९७९ साली कसोटी पदार्पण केलं आणि केवळ चार वर्षांच्या कालावधीत ३३ कसोटींमध्ये १०० हून अधिक विकेट्स घेतल्या.
त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारतासाठी ३३ कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी सहा वेळा पाच विकेट्स घेण्याचा विक्रमही केला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्येही यशस्वी कारकीर्द
दिलीप दोशी यांनी त्यांच्या कारकिर्दीत १५ एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी ३.९६ च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आणि एकूण २२ विकेट्स घेतल्या.
याशिवाय दिलीप दोशी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट देखील खेळले आहे. त्यांनी सौराष्ट्र, बंगाल, बर्कशायर आणि नॉटिंगहॅमशायरकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे.
दिलीप दोशी यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी कालिंदी, मुलगा नयन आणि मुलगी विशाखा यांचा समावेश आहे. दिलीप दोशी यांचा मुलगा नयन सौराष्ट्र आणि सरेसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे. दिलीप दोशी हे गेल्या दशकाहून अधिक काळ त्यांच्या कुटुंबासह लंडनमध्ये राहत होते आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.