Iker Guarrotxena: 'गोव्याला माझे घर मानतो'! स्पॅनिश ग्वॉर्रोचेनाचे प्रतिपादन; मोसमअखेरपर्यंत FC Goa संघात

Iker Guarrotxena FC Goa: स्पॅनिश आघाडीपटू इकेर ग्वॉर्रोचेना आणखी एका मोसमात एफसी गोवाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. क्लबने त्याच्याशी २०२५-२६ मोसमअखेरपर्यंत करार केला आहे.
Iker Guarrotxena FC Goa
Iker Guarrotxena FC GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: स्पॅनिश आघाडीपटू इकेर ग्वॉर्रोचेना आणखी एका मोसमात एफसी गोवाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. क्लबने त्याच्याशी २०२५-२६ मोसमअखेरपर्यंत करार केला असून ३२ वर्षीय फुटबॉलपटू गतमोसमात यशस्वी ठरला होता. गोव्याला आपण घर मानत असल्याची भावना त्याने करार वाढविताना व्यक्त केली.

ग्वॉर्रोचेना मैदानातील सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जातो. ‘तो निर्णायक असल्याने एक परिपूर्ण खेळाडू आहे,’ असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी प्रमुख खेळाडूचे कौतुक करताना सांगितले.

गोवा आणि एफसी गोवा संघाला मी घर मानतो. महत्त्वाकांक्षा आणि लढाऊ बाणा प्रदर्शित करण्यासाठी यासारखा दुसरा क्लब नाही. ड्रेसिंग रुममध्ये आम्ही एक घट्ट मैत्री असलेला गट तयार केला आहे. या एकसंधतेमुळे कोणतेही उद्दिष्ट गाठणे शक्य होते. या क्लबच्या मूल्यांशी माझी विचारसरणी चांगलीच जुळते,’ असे ग्वॉर्रोचेना याने एफसी गोवासोबत आणखी एका मोसमासाठी करार करण्याविषयी सांगितले.

Iker Guarrotxena FC Goa
Manolo Marquez: प्रशिक्षकपदी मार्केझच! सलग तिसऱ्या मोसमासाठी नियुक्ती; FC Goa साठी विक्रमी कामगिरी

ग्वॉर्रोचेना याने २०२४-२५ मध्ये एकूण ११ गोल व तीन असिस्टची नोंद केली होती. सुपर कप विजेतेपदाच्या मोहिमेत त्याने गोकुळम केरळाविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत हॅट्‌ट्रिक साधली होती. सर्वप्रथम २०२२-२३ मोसमात ग्वॉर्रोचेना एफसी गोवा संघात दाखल झाला होता. त्यावेळी त्याने एकूण १३ गोलचे योगदान दिले होते.

Iker Guarrotxena FC Goa
FC Goa: 'एफसी गोवा' बॅक टू ऍक्शन! AFC चँपियन्स लीगकडे लक्ष; जोरदार सराव सुरु

आयएसएल स्पर्धेत ग्वॉर्रोचेना याने एफसी गोवातर्फे एकूण १८ गोल केले असून २०२२-२३ मध्ये ११, तर २०२४-२५ मध्ये ७ गोल नोंदविले. आगामी एएफसी चँपियन्स लीग २ मोहिमेत स्पॅनिश स्ट्रायकर एफसी गोवासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com