WTC Final: तगड्या मास्टरप्लॅनची गरज! WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला पुढील 9 पैकी किती सामने जिंकावे लागणार?

ICC WTC Final 2025-2027: आता टीम इंडियाकडे WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी केवळ 9 कसोटी सामने शिल्लक आहेत.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

ICC WTC Final 2025-2027: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारताला पहिल्यांदा कोलकाता आणि आता गुवाहाटी येथे सलग दुसऱ्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचा फटका टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेतही बसला. गुणतालिकेत टीम इंडियाची पाचव्या स्थानी घसरण झाली. मात्र आता टीम इंडियाचा सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला.

आता टीम इंडियाकडे (Team India) WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी केवळ 9 कसोटी सामने शिल्लक आहेत. या उर्वरित सामन्यांमध्ये टीम इंडियाला उत्कृष्ट कामगिरी करुन आपले स्थान निश्चित करावे लागणार आहे. भारतीय चाहत्यांमध्ये सध्या या 9 सामन्यांपैकी नेमके किती सामने जिंकणे भारताला अनिवार्य आहे, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Team India
WTC Final Host Nation: भारताला पुन्हा डावललं, पुढील 3 'WTC Final'चं यजमानपद 'या' देशाकडे; ICC ची मोठी घोषणा

टीम इंडियाला करावा लागणार 'चमत्कार'

कसोटी मालिकेत झालेल्या निराशाजनक कामगिरीमुळे कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर सध्या प्रचंड दबाव आहे. WTC च्या अंतिम फेरीत स्थान पक्के करण्यासाठी टीम इंडियाला आता येत्या सामन्यांमध्ये जवळपास चमत्कारिक कामगिरी करावी लागणार आहे. उर्वरित 9 कसोटी सामन्यांचे स्वरुप आणि ठिकाण खालीलप्रमाणे...

  • विदेशी भूमीवर सामने: 4 कसोटी सामने (श्रीलंका आणि न्यूझीलंड दौऱ्यावर)

  • भारतीय भूमीवर सामने: 5 कसोटी सामने (ऑस्ट्रेलियाविरुद्ध)

उर्वरित 9 कसोटी सामन्यांचे वेळापत्रक

भारतीय भूमीवर ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध 5 सामन्यांची मोठी मालिका खेळायची आहे. श्रीलंकेच्या भूमीवर 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. तर न्यूझीलंडमध्ये कीवी संघाविरुद्ध 2 कसोटी सामने खेळायचे आहेत.

Team India
WTC Final 2025: विजयानंतर टेम्बा बावुमाचं भन्नाट सेलिब्रेशन! ट्रॉफी खांद्यावर ठेऊन केला हटके अंदाजात जल्लोष, पाहा VIDEO

फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 7 सामने जिंकणं गरजेचं

सध्याच्या WTC गुणतालिकेतील भारताची (India) स्थिती (PCT 48.15) पाहता अंतिम फेरी गाठण्यासाठी संघाला उर्वरित 9 सामन्यांमध्ये कमीत कमी 7 कसोटी सामने जिंकावे लागतील. 7 सामने जिंकल्यास भारताचा PCT 65 ते 70 टक्क्यांच्या दरम्यान पोहोचू शकतो. अंतिम फेरी गाठण्यासाठी हे लक्ष्य गाठणे अनिवार्य आहे. जर टीम इंडियाने या 9 सामन्यांपैकी एक किंवा दोन सामने गमावले, किंवा जास्त सामने ड्रॉ झाले, तर अंतिम फेरीत पोहोचण्याची त्यांची शक्यता इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहील. त्यामुळे पराभव टाळणे महत्त्वाचे आहे.

Team India
WTC Final 2025: ऑस्ट्रेलियन जोडीची कमाल, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडनं बनवला विश्वविक्रम रचला, पहिल्यांदाच घडलं असं काही

विशेषत: मायदेशात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या मालिकेत भारताला कमीतकमी 4 ते 5 सामने जिंकणे गरजेचे आहे, तर श्रीलंका आणि न्यूझीलंड दौऱ्यावरही किमान 2 ते 3 सामने जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल.

गुणतालिकेतील सध्याची स्थिती

सध्या ऑस्ट्रेलिया 100 PCT सह पहिल्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिका (75 PCT) दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया (48.15 PCT) पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारताला अंतिम फेरीत पोहोचायचे झाल्यास, उर्वरित 9 सामन्यांमध्ये अत्यंत आक्रमक आणि सातत्यपूर्ण प्रदर्शन करणे क्रमप्राप्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com