ICC Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया जाहीर; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Team India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Champions Trophy 2025

बहुप्रतिक्षित आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान खेळवली जाईल. ही स्पर्धा पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) संयुक्तपणे आयोजित करण्यात आलीय. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

निवड समितीच्या बैठकीनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली.

पत्रकार परिषदेत चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठीही संघाची घोषणा करण्यात आलीय. रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं असून शुभमन गीलला उपकर्णधार बनवण्यात आलंय.

Team India
Goa: 'गोवा रोबोटीक्स आणि कोडींगमध्ये देशाचे नेतृत्व करेल'; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन करण्यात आले आहेत. अ गटात पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश तर ब गटात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड संघाचा समावेश आहे.

Team India
IRCTC Goa Tour Package: 3 रात्री 4 दिवसांची सैर, विमानाने प्रवास; स्वस्तात करा गोवा टूर, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सामने

  • 20 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई

  • 23 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई

  • 2 मार्च - न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई

इंग्लंड सीरिजसाठी टीम इंडिया जाहीर

पत्रकार परिषदेत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या वन-डे सीरिजसाठी देखील टीम इंडियाची घोषणा करण्यात आली

रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, यशस्वी जायसवाल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, संजू सॅमसन, नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com