IRCTC Goa Tour Package: 3 रात्री 4 दिवसांची सैर, विमानाने प्रवास; स्वस्तात करा गोवा टूर, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Goa Delight irctc tour package: IRCTC च्या गोवा टूर पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइटने गोव्याला प्रवास करता येणार आहे. गोवा डिलाईट पॅकेजसाठी बुकिंग सुरु झाले आहे.
IRCTC Goa Tour Package: 3 रात्री 4 दिवसांची सैर, विमानाने प्रवास; स्वस्तात करा गोवा टूर, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IRCTC Tour PackageDainik Gomantak
Published on
Updated on

IRCTC Goa Tour Package

पणजी: IRCTC ने प्रवाशांसाठी एक अप्रतिम आणि स्वस्त टूर पॅकेज आणले आहे. या पॅकेज प्रवाशांना सर्व सुविधांसह विविध लाभही मिळणार आहेत. गोव्याचा इतिहास फारच वैविध्यपूर्ण आणि वैभवशाली सांस्कृतिक वारसा आहे.

पॅकेजमध्ये तुम्हाला जेवण आणि निवासाची काळजी करण्याची गरज नाही. कारण याचा खर्च पॅकेजमध्ये समाविष्ट असून, दौऱ्यात तुम्हाला इतरही अनेक सुविधांचा लाभ मिळणार आहे.

IRCTC च्या गोवा टूर पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइटने गोव्याला प्रवास करता येणार आहे. टूर पॅकेज 13 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे. IRCTC च्या या टूर पॅकेज अंतर्गत प्रवास करताना तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही.

कारण नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण अशा तिन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर गाईडची व्यवस्थाही IRCTC कडून करण्यात आली आहे.

IRCTC Goa Tour Package: 3 रात्री 4 दिवसांची सैर, विमानाने प्रवास; स्वस्तात करा गोवा टूर, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Goa Police: गोवा पोलिसांचे कारनामे पुन्‍हा एकदा चर्चेत! आठ महिन्‍यांत ४ पोलिस अटकेत, ११ निलंबित

किती रुपये खर्च येणार?

IRCTC चे गोवा टूर पॅकेज तीन श्रेणींमध्ये विभागले आहे. यात तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला 24,620 रुपये भाडे द्यावे लागेल. जर तुम्ही दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 19,245 रुपये मोजावे लागतील.

जर तुम्ही तीन लोकांसह जाण्याच्या तयारीत असाल तर प्रति व्यक्ती भाडे 18,935 रुपये भाडे तुम्हाला द्यावे लागेल. तुमची सीट बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC संकेतस्थळाला भेट देता येईल, किंवा IRCTC च्या जवळच्या कार्यालयाशीही संपर्क साधता येईल.

IRCTC चे गोव्यासाठी विविध टूर पॅकेज

गोव्यासाठी IRCTC चे जवळपास आठ पॅकेज आहेत. यात गोवा गुड वाईब्स, गोवा डिलाईट, मॅजिकल गोवा, गोवा ब्लिस यासारख्या पॅकेजचा समावेश आहे. यातील डिलाईट पॅकेज येत्या १३ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यासाठी बुकिंग प्रक्रिया सुरु झाली आहे.

IRCTC चे गोवा टूर पॅकेज बुक करण्यासाठी येथे क्लिक करा

गोवा टूर पॅकेजसंबधित अधिक माहितीसाठी IRCTC च्या संकेतस्थळाला किंवा जवळच्या आरक्षण केंद्राला भेट देता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com