AIFF: अपिल्स कमिटीचा पुन्हा इंटर काशीला धक्का! अपात्र खेळाडू खेळवल्याबद्दल कारवाई; आय-लीग ट्रॉफीसाठी चर्चिल ब्रदर्सचे स्थान भक्कम

I League Trophy: आय-लीग स्पर्धेच्या गुणतक्त्यातील नव्या समीकरणामुळे चर्चिल ब्रदर्सला आय-लीग विजेते घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
I League Trophy 2025
I League 2025 WinnerDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अपात्र खेळाडूला संघात स्थान दिल्याबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अपिल्स कमिटीने इंटर काशी संघावर पुन्हा एकदा कडक कारवाई केली, त्यामुळे विजेतेपदाच्या शर्यतीत गोव्यातील चर्चिल ब्रदर्स संघाचे अग्रस्थान भक्कम झाले.

आय-लीग स्पर्धेच्या गुणतक्त्यातील नव्या समीकरणामुळे चर्चिल ब्रदर्सला आय-लीग विजेते घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता प्रतीक्षा इंटर काशी संघाकडून होणाऱ्या अपिलाची असेल.

अपिल्स कमिटीच्या निर्णयानुसार, इंटर काशी संघाचा स्पॅनिश आघाडीपटू मारियो बार्को नोंदणीत अपात्र ठरला. त्याला आय-लीग सामन्यांत खेळविल्याबद्दल नामधारी एफसीने दाद मागितली होती. त्यांच्यानुसार बार्को हा इंटर काशीचा आय-लीग स्पर्धेतील सातवा परदेशी खेळाडू ठरला, तर नियमानुसार सहा परदेशी खेळाडू करारबद्ध करता येतात.

एक फेब्रुवारी रोजी इंटर काशीने हुआन पेरेझ डेल पिनो याचा करार संपुष्टात आणल्यानंतर बार्को याच्याशी फेरकरार केला होता. प्रतिस्पर्धी संघाच्या दाव्यानुसार एखाद्या खेळाडूस पुन्हा करारबद्ध करण्याचा नियम आय-लीगमध्ये नाही आणि त्यांनी यासंदर्भात अपिल्स कमिटीकडे दाद मागितली होती.

I League Trophy 2025
I League Trophy: चर्चिल ब्रदर्सकडून आय-लीग ट्रॉफी परत मागितली, AIFF चा आदेश; करंडक दिल्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित

बार्को संघात असताना नामधारी एफसीव्यतिरिक्त चर्चिल ब्रदर्स व रियल काश्मीर या संघाविरुद्ध इंटर काशी संघ आय-लीग स्पर्धेत खेळला होता. शनिवारी एआयएफएफ अपिल्स कमिटीने नामधारी एफसीचे अपिल ग्राह्य मानताना बार्को याचा फेरकरार अयोग्य ठरविला व या तिन्ही लढतीत इंटर काशीला पराभूत ठरविण्यात आले. त्यामुळे इंटर काशीविरुद्ध २-२ गोलबरोबरीत आता चर्चिल ब्रदर्सला विजयी मानले जाणार असून त्यामुळे त्यांची एकूण गुणसंख्या ४० वरून सर्वाधिक ४२ झाल्याने अग्रस्थान स्थान कायम राहील.

I League Trophy 2025
Churchill Brothers: चर्चिल ब्रदर्सला आणखी एक फटका, AIFF परवाना प्रक्रियेत संघ नापास; I League करंडकाचा निर्णय अजून प्रलंबित

चर्चिल ब्रदर्सकडून निर्णयाचे स्वागत

दरम्यान, चर्चिल ब्रदर्स एफसी गोवा संघाने एआयएफएफ अपिल्स कमिटीच्या शनिवारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. न्याय प्रक्रियेतील हा विजय आपले निष्ठावंत चाहते आणि हितचिंतकांना समर्पित असल्याचे चर्चिल ब्रदर्सने सोशल मीडियावर नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com