I League 2024: धेंपो क्लब भिडणार ‘नामधारी’शी! आय-लीग मध्ये चुरशीचा सामना; माजी विजेत्यांना सलग प्रवासाचा त्रास

Dempo Club Vs Namdhari FC: सध्या दुसऱ्या फेरीतीनंतर धेंपो क्लबच्या खाती विजय व बरोबरीसह चार गुण आहेत. मागील लढतीत त्यांनी शिलाँग येथे शिलाँग लाजाँग एफसीवर २-० फरकाने मात केली होती. त्यापूर्वी ऐजॉल एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले होते.
I League 2024
Footbal I League 2024X
Published on
Updated on

I League 2024 Dempo Club Vs Namdhari FC Football Match

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत नऊ वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने मागील दोन सामन्यांत उल्लेखनीय खेळ करताना अपराजित कामगिरी नोंदविली. मंगळवारी (ता. ३) लुधियाना येथे त्यांच्यासमोर नामधारी स्पोर्टस अकादमीचे आव्हान असेल. या लढतीत विजय नोंदविल्यास गोव्यातील संघाला गुणतक्त्यात प्रगतीची संधी असेल.

सध्या दुसऱ्या फेरीतीनंतर धेंपो क्लबच्या खाती विजय व बरोबरीसह चार गुण आहेत. मागील लढतीत त्यांनी शिलाँग येथे शिलाँग लाजाँग एफसीवर २-० फरकाने मात केली होती. त्यापूर्वी ऐजॉल एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. नामधारी संघाच्या खाती फक्त एक गुण आहे. त्यांनी दिल्ली एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले, तर राजस्थान युनायटेडकडून त्यांना १-३ फरकाने पराभव पत्करावा लागला.

धेंपो क्लबसाठी शिलाँग लाजाँगविरुद्ध पृथ्वेश पेडणेकर व मातिया बाबोविच यांनी प्रत्येकी एक गोल केला होता. नामधारी संघ मंगळवारी प्रमुख खेळाडू मनवीर सिंग याच्याविना मैदानात उतरेल. राजस्थान युनायटेडविरुद्ध त्याला रेड कार्ड मिळाले होते. धेंपो क्लबचे प्रशिक्षक समीर नाईक यांनी सांगितले, की ‘‘खेळाडूंना जबाबदारीचे भान आहे, त्याचवेळी ते खेळाचा आनंदही लुटत आहेत. पुढील लढतीसाठी संघ उत्सुक आहे. स्पर्धा आताच कुठे सुरू झालेली आहे. त्यामुळे संभाव्य विजेत्यांबाबत भाकीत करता येणार नाही. माझ्यामते प्रत्येक संघ तुल्यबळ असून त्यांच्यात सामना जिंकण्याची क्षमता आहे.’’

I League 2024
Cash For Job: दीड कोटी लुबाडणाऱ्या श्रुती प्रभुगावकरला बड्या; BJP आणि बड्या मंत्र्याच्या 'पीए'सोबत कनेक्शन उघड

सलग प्रवासाचा त्रास

धेंपो क्लबला सलग प्रवासाचा त्रास होऊ शकतो. कारण ईशान्य भारतातील शिलाँग येथे सामना खेळल्यानंतर लगेच त्यांना लुधियानासाठी रवाना व्हावे लागले. संघ रविवारी पहाटे पाच वाजता शिलाँग येथून निघाला व पंजाबमध्ये संध्याकाळी सात वाजता दाखल झाला. ‘‘प्रवास व्यस्त असला, तरी व्यावसायिक या नात्याने आम्हाला आव्हानास सामोरे जावेच लागेल. मी जेव्हा खेळत होतो तेव्हाही अशीच परिस्थिती असायची. आम्ही त्याचा कणखरपणे सामना केला. धेंपो संघाचे हे वैशिष्ट आहे, त्यामुळे संघाकडून मला चांगल्या कामगिरीचा विश्वास आहे,’’ असे समीर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com