I League 2024: धेंपो क्लब अव्वल स्थानी! श्रीनिदी डेक्कनवर 1-0 अशी निसटती मात; चर्चिल ब्रदर्स भिडणार इंटर काशी संघाशी

I Football League 2024: सामन्याच्या पूर्वार्धातील पेनल्टी गोलच्या बळावर माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने श्रीनिदी डेक्कनवर १-० अशी निसटती मात करून आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले.
Football
FootballDainik Gomantak
Published on
Updated on

I League 2024

पणजी: सामन्याच्या पूर्वार्धातील पेनल्टी गोलच्या बळावर माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने श्रीनिदी डेक्कनवर १-० अशी निसटती मात करून आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. सामना शुक्रवारी तेलंगणातील डेक्कन अरेनावर झाला.

अर्जेंटिनातील २९ वर्षीय मध्यरक्षक ख्रिस्तियन दामियान पेरेझ रोआ याने सामन्याच्या नवव्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर अचूक लक्ष्य साधले. समीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील धेंपो क्लबने अखेरपर्यंत ही आघाडी टिकवली. श्रीनिदी डेक्कनने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले, पण त्यांना सफलता मिळाली नाही. भरपाई वेळेत जोरदार फटका गोलपोस्टला आपटल्यामुळे यजमान संघाला पराभवाचा सामोरे जावे लागले.

Football
Goa Politics : खरी कुजबुज: डॉ. प्रमोद सावंतांना मिळणार एक्स्टेंशन?

मागील लढतीत स्पोर्टिंग क्लब बंगळूरविरुद्ध पराभूत झालेल्या धेंपो क्लबने शुक्रवारी स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांचे आता पाच लढतीतून १० गुण झाले आहेत. श्रीनिदी डेक्कनला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाच सामन्यानंतर त्यांचे सहा गुण कायम राहिले. धेंपो क्लबचा पुढील सामना गोव्यातील प्रतिस्पर्धी चर्चिल ब्रदर्सविरुद्ध १८ डिसेंबर रोजी खेळला जाईल.

Football
Under-23 ODI Cricket Tournament: शिवेंद्र करणार लढवय्या गोव्याचं नेतृत्व! 23 वर्षांखालील वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी संघ जाहीर

चर्चिल ब्रदर्सचा आज सामना

आय-लीग स्पर्धेतील चर्चिल ब्रदर्सचा सामना शनिवारी (ता. १४) इंटर काशी संघाविरुद्ध पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे खेळला जाईल. इंटर काशी संघाचे चार लढतीतून आठ गुण असून चर्चिल ब्रदर्स संघही चार सामने खेळला असून त्यांचे सात गुण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com