IND vs ENG 3rd Test: गिलसाठी 'लॉर्ड्स टेस्ट' बनणार अग्निपरीक्षा, क्रिकेटच्या पंढरीत कसा आहे भारताचा रेकॉर्ड? आकडे भरवतात धडकी

India Test Record At Lord's: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे.
India Test Record At Lord's
Team indiaDainik Gomantak
Published on
Updated on

India Test Record At Lord's: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. यापूर्वी, 5 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. एजबॅस्टन येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय नोंदवला, त्यामुळे आता मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. आता तिसरा सामना 10 जुलैपासून खेळला जाईल. अशा परिस्थितीत, तिसऱ्या कसोटीपूर्वी लॉर्ड्स मैदानावर टीम इंडियाचा कसोटी रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊया?

लॉर्ड्सवर भारताचा रेकॉर्ड कसा आहे?

दरम्यान, भारताने (India) आतापर्यंत लॉर्ड्सवर 19 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत. भारताने पहिला सामना 1986 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा 2014 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. तिसरा सामना 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 151 धावांनी जिंकला होता. भारताने 1932 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी सीके नायडू भारताचे नेतृत्व करत होते, तर डग्लस जार्डिन इंग्लंडचे नेतृत्व करत होते. भारताने तो सामना 158 धावांनी गमावला होता. त्यानंतर, भारताने लॉर्ड्सवर एकूण 19 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत, तर 4 सामने अनिर्णित राहिले आहेत आणि 12 सामने गमावले आहेत.

India Test Record At Lord's
IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड! हेडिंग्लेनंतर एजबॅस्टनमध्येही लय गवसली नाही

भारताचे आकडे निराशाजनक

भारतासाठी हे आकडे निश्चितच निराशाजनक आहेत, परंतु चांगली गोष्ट म्हणजे भारताने लॉर्ड्सवर खेळलेल्या शेवटच्या 3 सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला. 2014 मध्ये, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडचा 95 धावांनी पराभव केला होता तर 2021 मध्ये, भारताने इंग्लंडवर 151 धावांनी विजय मिळवला होता. यावेळी आता टीम इंडियाची कमान युवा फलंदाज शुभमन गिलच्या हाती असून त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लॉर्ड्सवरही जिंकू इच्छिते.

दुसरीकडे, इंग्लंडच्या (England) रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर 145 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी 59 सामने जिंकले असून 35 सामने गमावले आहेत. तसेच, 51 सामने अनिर्णित राहिले आहेत.

India Test Record At Lord's
IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

इंग्लंडने तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर केला

इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. यावेळी गस अ‍ॅटकिन्सन आणि जोफ्रा आर्चर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रुट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com