Manish Jadhav
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध कृष्णा भारतासाठी कमाल करु शकला नाही.
या सामन्यात त्याने 6 पेक्षा जास्त इकॉनॉमीने धावा दिल्या. अशाप्रकारे त्याच्या नावावर एक लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवला गेला.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात किमान 500 चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत प्रसिद्ध कृष्णा अव्वल स्थानी पोहोचला.
या 29 वर्षीय गोलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये 588 चेंडू टाकताना 518 धावा दिल्या. या दरम्यान त्याची इकॉनॉमी 5.28 होती. जी रेड बॉल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट आहे.
या सामन्यात कृष्णाने पहिल्या 8 षटकात 7.60 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. या मालिकेत आतापर्यंत त्याने 6.53 च्या सरासरीने धावा दिल्या.
त्याने तिसऱ्या दिवशी पहिला स्पेल टाकला आणि त्याच्या 5 षटकांच्या स्पेलमध्ये 50 धावा दिल्या. 2006 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाने टाकलेला हा सर्वात महागडा स्पेल आहे.