Harsh Patre: 'हा' धाकड खेळाडू दिसणार FC Goaच्या जर्सीत! प्रतिक्षेनंतर 22 वर्षीय गोमंतकीय मध्यरक्षक करारबद्ध

Harsh Patre FC Goa: गोमंतकीय प्रतिभावान फुटबॉल मध्यरक्षक हर्ष पत्रे आगामी २०२५-२६ मोसमात एफसी गोवा संघाच्या जर्सीत खेळताना दिसेल. या खेळाडूला करारबद्ध करण्यासाठी संघाला सात वर्षे वाट पाहावी लागली.
Harsh Patre FC Goa
Harsh Patre FC GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोमंतकीय प्रतिभावान फुटबॉल मध्यरक्षक हर्ष पत्रे आगामी २०२५-२६ मोसमात एफसी गोवा संघाच्या जर्सीत खेळताना दिसेल. या २२ वर्षीय खेळाडूला करारबद्ध करण्यासाठी संघाला सात वर्षे वाट पाहावी लागली.

हर्ष १५ वर्षांचा असताना एफसी गोवा संघाला त्याच्या गुणवत्तेने प्रभावित केले होते, आता त्याला करारबद्ध केल्याने स्थानिक गुणवत्तेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे या युवा मध्यरक्षकाला करारबद्ध करताना क्लबने नमूद केले. ‘एआयएफएफ’ ज्युनियर लीग स्पर्धेत खेळताना २०१८-१९ मध्ये डिचोली येथे जन्मलेल्या हर्ष याच्या प्रतिभेने एफसी गोवा संघाला प्रभावित केले होते.

‘हर्षचे फुटबॉलमधील तांत्रिक कौशल्य, खेळाची समज व निर्णयक्षमता यामुळे आम्ही प्रभावित झालो. एफसी गोवासाठी खेळाडू करारबद्ध करताना आम्ही हेच गुण शोधतो,’ असे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक लोकेश भेरवानी यांनी सांगितले. हर्षला करारबद्ध करण्यासाठी क्लबने यापूर्वी दोनवेळा प्रयत्न केले होते, त्यात यश आले नव्हते. यावर्षी प्रारंभी आम्ही त्याच्यासाठी इच्छुकता दाखविली. घरच्या मैदानावरील पाठिराख्यांच्या साक्षीने खेळण्यासाठी आम्ही त्याची मान्यता मिळवू शकलो, अशी कबुलीही भेरवानी यांनी दिली.

‘हर्षच्या मागील काही वर्षांतील विकास आणि प्रगती अनुभवल्यानंतर तो एफसी गोवाच्या शैलीत चपखल बसतो याची आम्हाला कल्पना आहे. कारकिर्दीच्या या टप्प्यावर हर्ष संघाचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे,’ असे भेरवानी म्हणाले.

Harsh Patre FC Goa
Jay Gupta: जय गुप्तासाठी FC Goa ला मिळाली 'विक्रमी' रक्कम! बदल करारांतर्गत खेळणार ईस्ट बंगालकडून

प्रतिभावान फुटबॉलपटू

हर्ष हा गोवा फुटबॉल विकास मंडळ (जीएफडीसी) अकादमीचा माजी प्रशिक्षणार्थी आहे. नंतर त्याची गुणवत्ता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) प्रज्ञाशोध समितीने हेरली आणि तो महासंघाच्या महत्त्वाकांक्षी इंडियन ॲरोज प्रकल्पात दाखल झाला. ॲरोजतर्फे तो आय-लीग फुटबॉल स्पर्धेत चमकल्यानंतर त्याला २०२२-२३ मध्ये बंगळूर एफसीने आपल्या राखीव संघासाठी निवडले आणि नंतर त्याने त्यांच्या मुख्य संघापर्यंत प्रगती साधली. हर्षने २०२३-२४ मोसमात इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पदार्पण केले. बंगळूर एफसीत तो दोन आयएसएल मोसमात २१ सामन्यांत ९९१ मिनिटे खेळला, तसेच एक गोलही नोंदविला.

Harsh Patre FC Goa
Odei Onaindia: ..सदैव गौर! कर्णधार ओडेईला FC Goa चा निरोप

‘एफसी गोवातर्फे खेळणे ही माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. गोमंतकीय या नात्याने हा क्लब माझ्यासाठी खास आहे. या संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी नेहमीच इच्छुक होतो. आता माझ्यासाठी ही चांगली संधी असून मी पूर्ण क्षमतेने योगदान देण्याचा निश्चय केला आहे.’

- हर्ष पत्रे, फुटबॉल मध्यरक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com