Chess Championship Mysore: म्हैसूर बुद्धिबळ स्पर्धेत प्रयांकची दमदार कामगिरी! अखेरच्या फेरीत रौप्यपदकाला गवसणी

Goa Chess: प्रयांकने राष्ट्रीय रौप्यपदकासह स्पर्धेतून ६५ एलो गुणांचीही कमाई केली
Goa Chess: प्रयांकने राष्ट्रीय रौप्यपदकासह स्पर्धेतून ६५ एलो गुणांचीही कमाई केली
Prayank Gaonkar|silver medalDainik Gomantak
Published on
Updated on

37th National Chess Championship Mysore

पणजी: म्हैसूर येथे झालेल्या ३७व्या राष्ट्रीय सात वर्षांखालील वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या प्रयांक गावकर याने रौप्यपदक जिंकले. प्रयांक (एलो गुण १४९१) याने अखेरच्या फेरीत तमिळनाडूच्या केविन वेलावन याला नमवून रौप्यपदकावर शिक्कामोर्तब केले. त्याने नऊ फेऱ्यांत आठ विजय व एक पराभव या कामगिरीसह आठ गुणांची कमाई केली. केरळचा काल्लियथ देवनारायणन याने सर्व डाव जिंकत नऊ गुणांसह सुवर्णपदक प्राप्त केले. पश्चिम बंगालचा आराध्यो गुईन साडेसात गुणांसह ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.

Goa Chess: प्रयांकने राष्ट्रीय रौप्यपदकासह स्पर्धेतून ६५ एलो गुणांचीही कमाई केली
Goa Chess Player Ethan Vaz: बुद्धिबळपटू एथन वाझला पहिला ‘आयएम’ नॉर्म

प्रयांकने राष्ट्रीय रौप्यपदकासह स्पर्धेतून ६५ एलो गुणांचीही कमाई केली. त्याने दुसऱ्या फेरीतील पराभवनंतर ओळीने सात डाव जिंकून खुल्या गटात दुसरा क्रमांक पटकावला. तो मडगाव येथील मनोविकास इंग्लिश स्कूलमध्ये पहिल्या इयत्तेत शिकतो. गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी व इतर पदाधिकाऱ्यांनी पदक विजेत्या प्रयांकचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com