

पणजी: गोव्याच्या कनिष्का निम्बूरिया हिने पंजाबमधील जालंधर येथे सुरू असलेल्या भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या राष्ट्रीय सबज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत मुलींच्या गटात ब्राँझपदक जिंकले. कनिष्का साल्वादोर द मुंद येथील आरसीसी केंद्राची प्रशिक्षणार्थी आहे.
तिला गोवा क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक चितंबर नाईक, तसेच विश्वनाथ नाईक यांचे यांचे मार्गदर्शन लाभले. कनिष्काच्या ब्राँझपदकाव्यतिरिक्त गोव्याच्या अन्य सात बॉक्सरनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली.
यामध्ये सहा मुली व एका मुलाचा समावेश होता. गोवा हौशी बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष फ्रान्सिस व्हिएगस यांनी पदक विजेत्या कनिष्काचे अभिनंदन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.