वेटलिफ्टर ॲग्नेसला ब्राँझपदक, गोव्याला 'खेलो इंडिया आदिवासी' स्पर्धेत पहिले पदक

Agnes Fernandes bronze medal Goa: वेटलिफ्टर ॲग्नेस फर्नांडिस हिने गोव्यासाठी खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेत पहिले पदक जिंकले.
Agnes Fernandes bronze medal Goa
Agnes Fernandes bronze medal GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वेटलिफ्टर ॲग्नेस फर्नांडिस हिने गोव्यासाठी खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेत पहिले पदक जिंकले. तिला सीनियर महिला वेटलिफ्टिंगमधील ६९ किलो वजनगटात ब्राँझपदक मिळाले. स्पर्धा छत्तीसगडमध्ये सुरू आहे.

वेटलिफ्टिंग स्पर्धा रायपूर येथील पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठात झाली. ब्राँझपदक विजेत्या ॲग्नेस हिने एकूण १३० किलो वजन उचलले. तिने स्नॅचमध्ये दुसऱ्या प्रयत्नांत ५२ किलो वजन, तर क्लीन अँड जर्कमध्ये सर्वाधिक ७८ किलो वजन उचलून तिसरा क्रमांक मिळविला.

Agnes Fernandes bronze medal Goa
Goa Weather Update: कडाक्याच्या उन्हात पावसाची एन्ट्री! पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज

ॲग्नेस हिला रौप्यपदक थोडक्यात हुकले. आसामच्या पल्लवी पायेंग हिने १३१ किलो वजन उचलून दुसरा क्रमांक मिळविला. तिने स्नॅचमध्ये ६१ किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये ७० किलो वजन पेलले. आसामच्याच डिम्पी सोनोवाल हिने एकूण १५५ किलो वजन (७० व ८५ किलो) उचलून सुवर्णपदकाची कमाई केली.

Agnes Fernandes bronze medal Goa
Sexual Assault Cases Goa: राज्यात तीन महिन्यांत लैंगिक अत्याचाराच्या 34 घटना, कायदा- सुव्यवस्थेवर प्रश्‍न; तपासाऐवजी प्रकरणे दडपण्याचेच प्रकार अधिक

सासष्टी तालुक्यातील नुवे येथील ॲग्नेस पणजीतील डॉन बॉस्को महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. स्पर्धेत तिला क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाचे वेटलिफ्टिंग प्रशिक्षक अँड्र्यू गोम्स यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com