Under-19 Women's T20 Cricket: पुदुचेरीनं उडवली गोव्याची दाणादाण, संथ फलंदाजीनं केला घात; सलग दुसऱ्या पराभवाची नोंद

Under-19 Women's Goa Team: गोव्याला 19 वर्षांखालील महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.
Under-19 Women's T20 Cricket: पुदुचेरीनं गोव्याची उडवली दाणादाण, संथ फलंदाजीनं केला घात; सलग दुसऱ्या पराभवाची नोंद
Under-19 Women's T20 CricketDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याला १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत बुधवारी सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. झारखंडमधील रांची येथे झालेल्या सामन्यात त्यांच्यावर पुदुचेरी संघाने आठ विकेट राखून सहज मात केली. गोव्याच्या पराभवास संथ फलंदाजी कारणीभूत ठरली. गोव्याने निर्धारित २० षटकात ४ बाद ७६ धावा केल्या. त्यात हिमाचल प्रदेश विरुद्ध अगोदरच्या लढतीत अर्धशतक केलेल्या पलक आरोंदेकर हिने सर्वाधिक ४४ धावा केल्या. तिने ५८ चेंडूत पाच चौकार मारले.

पुदुचेरी संघाची कर्णधार व सलामीची बॅटर ई. कविशा हिने आक्रमक फलंदाजी करताना अवघ्या ३० चेंडूत नऊ चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या. त्यामुळे पुदुचेरीने फक्त ८.२ षटकांतच २ बाद ८२ धावा करून सामना जिंकला. गोव्याला पहिल्या लढतीत मंगळवारी हिमाचल प्रदेशने नऊ विकेट राखून हरविले होते.

Under-19 Women's T20 Cricket: पुदुचेरीनं गोव्याची उडवली दाणादाण, संथ फलंदाजीनं केला घात; सलग दुसऱ्या पराभवाची नोंद
Under 19 Womens Cricket: हर्षिता यादवकडे गोव्याचे नेतृत्व; 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघ जाहीर

संक्षिप्त धावफलक:

गोवा: २० षटकांत ४ बाद ७६ (हर्षिता यादव ९, पलक आरोंदेकर ४४, अथश्री शिवारकर ११, स्वराली कासार १०, निखिला नाईक नाबाद २, ई. कविशा २-१४, श्रीहर्षिनी देवी २-१४) पराभूत वि. पुदुचेरी ः ८.२ षटकांत २ बाद ८२ (ई. कविशा नाबाद ५०, अथश्री शिवारकर १-०-८-०, हर्षिता यादव १-०-१५-०, सिद्धी सवासे २-०-१४-०, निखिला नाईक २-०-२६-०, विधी भांडारे २-०-११-१, नंदिनी चौहान ०.२-०-८-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com