Football: पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत गोवा विद्यापीठाचा पुरुष संघ विजेता

Goa University Footbal Team: अखिल भारतीय स्पर्धा २९ जानेवारीपासून कानपूर येथील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठातर्फे घेण्यात येईल.
Football: पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत गोवा विद्यापीठाचा पुरुष संघ विजेता
Football Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विद्यापीठाच्या पुरुष फुटबॉल संघाने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. गुजरातमधील बडोदा येथील पारुल विद्यापीठातर्फे स्पर्धा घेण्यात आली.

पश्चिम विभागात गोवा विद्यापीठ संघाने अपराजित कामगिरीसह सात गुणांची कमाई करून अव्वल क्रमांक मिळविला. नंतर प्ले-ऑफ लढतीत गोवा विद्यापीठाने नागपूरच्या आरटीएम विद्यापीठास २-१ फरकाने हरवून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पुरुष फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

या लढतीतील दोन्ही गोल संकल्प काणकोणकर याने नोंदविले. अखिल भारतीय स्पर्धा २९ जानेवारीपासून कानपूर येथील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठातर्फे घेण्यात येईल.

पश्चिम विभागात गोवा विद्यापीठ अव्वल ठरले, पारुल विद्यापीठास दुसरा, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठास तिसरा, तर मुंबईच्या सोमय्या विद्यापीठास चौथा क्रमांक मिळाला.

Football: पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत गोवा विद्यापीठाचा पुरुष संघ विजेता
Mens U23 State A Trophy: काश्मीरपुढे गोव्याचा निभाव नाही लागला, 72 धावांनी पराभव

विजयी संघातील खेळाडू

देव वर्मा, मुजफर धालायत, साहिल गावकर, वेदांत नाईक, आदर्श राज, अजय राज, पुष्कर प्रभू, भास्कर जल्मी, आर्यन साळुंके, आकाश सिंग, शाविझ खान पठाण, ॲरेन फिगरेदो, आर्नोल्ड ऑलिव्हेरा, अश्वेक जाधव, गेल डिकॉस्ता, ॲलरिको कार्दोझ, निहार नाईक, तोपोन मिंझ, विशाल वरगावकर, सनी परब, मंजुनाथ चौहान, संकल्प काणकोणकर.

प्रशिक्षक: सावियो फर्नांडिस,

साहाय्यक प्रशिक्षक: मायकल डायस,

संघ व्यवस्थापक: सिद्धेश केसरकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com