

पणजी ः गोव्याच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने मंगळवारी शानदार अष्टपैलू चमक प्रदर्शित केली. त्यामुळे त्यांना या वयोगटातील आंतरराज्य एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पुदुचेरीवर सहा विकेट राखून विजय नोंदविणे शक्य झाले.
पुदुचेरी क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील सामन्यात यजमान संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २७७ धावा केल्या. गोव्याच्या गोविंद सावळ याने चार गडी बाद केले. नंतर गोव्याने ४ बाद २७९ धावा करून सामना जिंकला.
विनीत कामत (५६ धावा ९३ चेंडू, ६ चौकार), आफ्रिदसाब राजक्कनावर (५२ धावा ८९ चेंडू, ५ चौकार), मोहित यादव (५९ धावा २६ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार) व आराध्य गोयल (नाबाद ६७ धावा ४८ चेंडू, ६ चौकार, १ षटकार) यांच्या अर्धशतकांमुळे गोव्याने दोन चेंडू राखून चार विकेटच्या मोबदल्यात विजय साकारला.
संक्षिप्त धावफलक
पुदुचेरी ः ४७.४ षटकांत सर्वबाद २७७ (डोनाव्हन विल्सन ५४, आर. जीवितेशन ७१, आर. शैलेश वैथियानाथन ३१, हारिस मराईकार ४५, हरी प्रसाद २७, अंकित सिंग २५, गोविद सावळ ९.४-०-५५-४, मिहीर कुडाळकर १०-१-४९-१, शौनक तेली ८-१-४२-१, ओम खांडोळकर ३-०-३१-०, मोहित यादव ३-०-१९-१, जय कांगुरी ८-१-५०-१, आफ्रिदसाब राजक्कनावर ६-०-३१-१) पराभूत वि. गोवा ४९.४ षटकांत ४ बाद २७९ (आदित्य कोटा १७, विनीत कामत ५६, आफ्रिदसाब राजक्कनावर ५२, मोहित यादव ५९, आराध्य गोयल नाबाद ६७, मिहीर कुडाळकर नाबाद १६, हारिस मराईकार २-५१).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.