Goa U19 Cricket: गोव्याच्या फिरकी गोलंदाजांचा प्रभावी मारा; केरळला 302 धावांत रोखले; आफ्रिदचे 4, ओमचे 3 बळी

Kerala vs Goa U19: पुदुचेरी येथे सुरू असलेल्या सामन्यात शुक्रवारी सकाळी केरळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
Kerala vs Goa U19
Goa U19 CricketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पुदुचेरी क्रिकेट संघटनेच्या १९ वर्षांखालील पुरुष आंतरराज्य मल्टि-डे क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत गोव्याच्या फिरकी गोलंदाजांनी छाप पाडली, त्यामुळे त्यांना केरळचा डाव चांगल्या सुरवातीनंतर ३०२ धावांत गुंडाळणे शक्य झाले.

पुदुचेरी येथे सुरू असलेल्या सामन्यात शुक्रवारी सकाळी केरळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा सलामीचा फलंदाज अर्जुन हरी याच्या शतकामुळे ते एक बाद १३५ असे सुस्थितीत होते.

Kerala vs Goa U19
Goa Tourist Place Ban: गोव्यातील 'या' प्रसिद्ध ठिकाणी पर्यटकांना बंदी! ग्रामस्थांनी घेतला निर्णय; कचरा, धांगडधिंग्यामुळे ठराव मंजूर

नंतर गोव्याचा कर्णधार ऑफस्पिनर आफ्रिदसाब राजक्कनावर (४-३१) व डावखुरा फिरकी गोलंदाज ओम खांडोळकर (३-६५) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे गोव्याला लगाम खेचणे शक्य झाले. याशिवाय फिरकी गोलंदाज मिहीर कुडाळकर यानेही दोन गडी बाद केले. केरळाच्या अर्जुन हरी याने १९२ चेंडूंत १५ चौकार व एका षटकारासह १३० धावा केल्या.

सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर गोव्याने १ बाद ५ धावा केल्या होत्या.संक्षिप्त धावफलक केरळ ः ८३.४ षटकांत सर्वबाद ३०२ (अर्जुन हरी १३०, ईशान राज ३३, जयदेव नायर ३६, लेरॉय ज्योकिन २३, गोविंद सावळ ६-०-२१-०, तनेश तेंडुलकर ४-१-८-०, मिहीर कुडाळकर २७-५-९१-२, आफ्रिदसाब राजक्कनावर १५.४-३-३१-४, ओम खांडोळकर १९-१-६५-३, मोहित यादव १२-०-६३-०).गोवा ः ५ षटकांत १ बाद ५ (आदित्य कोटा नाबाद २, स्वप्नेश नाईक ०, मिहीर कुडाळकर नाबाद ३).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com