Ranji Trophy: रणजी संघ 'निवड चाचणी' बंगळूरमध्ये, गोव्याची थिम्माप्पिया करंडक क्रिकेट स्पर्धेत KSCA अध्यक्षीय संघाविरुद्ध लढत; अर्जुन तेंडुलकर, ललित यादव सज्ज

Goa Ranji Trophy: गोव्याची यावेळच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मोहीम ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
Goa Ranji Trophy
Ranji TrophyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याची यावेळच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मोहीम ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी संघ बांधणी करण्याच्या उद्देशाने स्पर्धात्मक ‘निवड चाचणी’ बंगळूरमध्ये मंगळवारपासून सुरू होईल.

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) डॉ. (कॅप्टन) के. थिम्माप्पिया स्मृती क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा सहभाग असून या चार दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे मुख्य प्रशिक्षक दिनेश मोंगिया यांना रणजी संघ निवड करणे सोपे ठरणार आहे. स्पर्धेत गोव्याचा अ गटात समावेश आहे. यजमान केएससीए अध्यक्षीय, विदर्भ, आंध्र असे मातब्बर प्रतिस्पर्धी गोव्याच्या गटात आहेत. त्यापैकी विदर्भविरुद्ध गोव्याचा संघ रणजी करंडक स्पर्धेतही खेळेल.

Goa Ranji Trophy
Goa Congress: राहुल गांधींवरील 'FIR'विरोधात गोवा काँग्रेस आक्रमक; आझाद मैदानासह मडगावात जोरदार निषेध, 'आवाज दडपता येणार नाही'चा इशारा

गोव्याचा पहिला चार दिवसीय सामना मंगळवारपासून बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर केएससीए अध्यक्षीय संघाविरुद्ध होईल. त्यानंतर ७ ते १० सप्टेंबर या कालावधीत विदर्भाविरुद्ध, तर १३ ते १६ सप्टेंबर या कालावधीत आंध्रविरुद्ध गोव्याचा सामना होईल. गतवर्षी गोव्याचा सीनियर संघ या स्पर्धेत खेळला होता व त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती.

हल्लीच ओमान दौऱ्यात एकदिवसीय मालिकेत सरस ठरलेल्या गोव्याचा संघाचा आता चार दिवसीय सामन्यांत कस लागेल.गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) ओमान दौऱ्यानंतर थेट बंगळूर येथे संभाव्य रणजी संघाचे शिबिर सुरू केले होते. निवडलेल्या संभाव्य संघातील काही दुखापतग्रस्त खेळाडूंना माघारी बोलावण्यात आले असून बाकी खेळाडू थिम्माप्पिया स्मृती क्रिकेट स्पर्धेत खेळतील.

अर्जुन, ललित दाखल; अभिनव अनुपलब्ध

जीसीए सचिव तुळशीदास शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याकडून सलग पाचवा मोसम खेळणारा अर्जुन तेंडुलकर, तसेच दुसऱ्या मोसमासाठी सज्ज झालेला ललित यादव हे ‘पाहुणे’ क्रिकेटपटू बंगळूर येथे संभाव्य खेळाडूंच्या शिबिरात दाखल झाले आहेत. थिम्माप्पिया स्पर्धेत निवडीसाठी ते उपलब्ध असतील.

Goa Ranji Trophy
Goa Shooting Incidents: 'कायदा-सुव्यवस्था आहे कुठे?' राज्यातील गोळीबाराच्या घटनांवर युरी आलेमाव आक्रमक, 10 वर्षांत 10 घटनांचा दिला दाखला

गतमोसमातील रणजी स्पर्धेत यशस्वी ठरलेला डावखुरा फलंदाज अभिनव तेजराणा या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गोव्यातर्फे खेळू शकणार नाही, कारण - त्याची दुलीप करंडक स्पर्धेसाठी दक्षिण विभाग संघात निवड झाली आहे. दक्षिण विभाग संघाने अंतिम सामन्यात अभिनव गोव्यासाठी थिम्माप्पिया स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यासही अनुपलब्ध असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com