Goa Sports: ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांना बक्षिसांतर्गत रोख रक्कम देण्याचा शब्द शनिवारी गोवा ऑलिंपिक असोसिएशनने पाळला
medal winners of 37th National Games Dainik Gomantak

Goa Olympic Association: ऑलिंपिक असोसिएशनने शब्द पाळला; खेळाडू आनंदी

Goa Sports: ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांना बक्षिसांतर्गत रोख रक्कम देण्याचा शब्द शनिवारी गोवा ऑलिंपिक असोसिएशनने पाळला
Published on

पणजी: गतवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये राज्यात झालेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांना बक्षिसांतर्गत रोख रक्कम देण्याचा शब्द शनिवारी गोवा ऑलिंपिक असोसिएशनने (जीओए) पाळला, त्यामुळे गोमंतकीय क्रीडापटूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

‘जीओए’च्या वार्षिक आमसभेनंतर बक्षीस वितरण झाले. संघटनेचे अध्यक्ष केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, सचिव गुरुदत्त भक्ता, खजिनदार जयेश नाईक, उपाध्यक्ष राजू मंगेशकर यांची उपस्थिती होती. संघटनेचे दिवंगत खजिनदार परेश कामत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Goa Sports: ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांना बक्षिसांतर्गत रोख रक्कम देण्याचा शब्द शनिवारी गोवा ऑलिंपिक असोसिएशनने पाळला
Goa Sports News: आदित्य काणकोणकरची सुवर्णझेप; भारतीय संघात निवड

गोव्याने विक्रमी कामगिरी बजावताना २७ सुवर्ण, २७ रौप्य व ३८ ब्राँझ मिळून एकूण ९२ पदके जिंकली होती. नंतर डोपिंगमध्ये ब्राँझपदक जिंकलेला ॲथलीट (धावपटू) दोषी आढळला होता. त्यामुळे त्याला पदक गमवावे लागले. ॲथलेटिक्स वगळता एकूण १५ क्रीडा संघटनांच्या खेळाडूंनी पदके जिंकली.

जीओए मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांच्या केवळ गोमंतकीय क्रीडापटूंना रोख रक्कम देण्यात आली. अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझपदक विजेते खेळाडू, तसेच संघांना मिळून गोवा ऑलिंपिक असोसिएशनतर्फे एकत्रित १२ लाख २५ हजार रुपये बक्षीस रक्कम वितरीत करण्यात आली. सुवर्णपदकासाठी एक लाख रुपये, रौप्यपदकासाठी ५० हजार रुपये, तर ब्राँझपदकासाठी २५ हजार रुपये बक्षीस रक्कम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com