Ironman Triathlon 2026: गोव्यात 'आयर्नमॅन'चा थरार! 30 देशांतील 2 हजारांहून अधिक ट्रायथलीट्स मैदानात

Goa Ironman 70.3: 2000 Athletes from 30 Countries in Goa ‘आयर्नमॅन ७०.३’ला मिरामार समुद्रकिनारी सुरवात होईल, त्यानंतर पणजी शहरातून पुढील टप्पा पार पडेल.
Goa Ironman 70.3
Ironman TriathlonDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्यातील ‘आयर्नमॅन ७०.३’ मध्ये यंदा तीस देशांतील स्पर्धकांचा प्रतिसाद लाभला असून या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत रविवारी (ता. १) दोन हजाराहून जास्त ॲथलीट सहभागी होणार असून त्यात गोव्यातील ट्रायथलीट्सचाही मोठा उत्साह दिसेल. माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

‘आयर्नमॅन ७०.३’ला मिरामार समुद्रकिनारी सुरवात होईल, त्यानंतर पणजी शहरातून पुढील टप्पा पार पडेल. राज्यातील दीडशे स्पर्धक कौशल्य पणाला लावतील. गुरुवारी स्पर्धेचे टी-शर्ट व पदकाचे अनावरण झाले. ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षपूर्तीनिमित्त स्पर्धकांच्या टी-शर्टवर विशेष चिन्ह असेल.

Goa Ironman 70.3
Goa Mining: सावर्डेत खनिज वाहतुकीला ब्रेक! 70 ट्रक स्थानिकांनी रोखले; बाहेरील ट्रकांना विरोध

आयर्नमॅनचे जागतिक भागीदारी प्रमुख जेरेमी कॅन आणि आयर्नमॅन इंडियाचे प्रमुख दीपक राज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दीपक यांनी सांगितले की, स्पर्धेच्या पहिल्या वर्षी २५ ते ३० गोमंतकीय होते. आता ही संख्या १५० वर पोहोचली आहे. पहिल्या वर्षी एक हजार स्पर्धक सहभागी झाले होते, तर यंदा ही संख्या दोन हजारांहून अधिक झाली आहे.

गोवा पर्यटन खाते, पोलिस, विविध सरकारी विभाग आणि मुख्यमंत्री यांच्या सहकार्यामुळेच हा टप्पा गाठता आला. अशा स्पर्धांमुळे नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत असला, तरी पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. भारतात अशा स्पर्धांचे आयोजन वाढवून देशातील नागरिकांना व्यायामासाठी प्रोत्साहित करण्याचेे उद्दिष्ट असल्याचे जेरेमी कॅन यांनी सांगितले.

‘आयर्नमॅन ७०.३’मध्ये १.९ किलोमीटर जलतरण, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१.१ किलोमीटर धावणे यांचा समावेश आहे. राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले, की ‘‘क्रीडा पर्यटनामुळे केवळ खेळाडूच नव्हे, तर त्यांचे कुटुंबीय, प्रेक्षक आणि हितचिंतकही गोव्यात येतात. त्यामुळे गोव्याला पर्यटनस्थळ म्हणून अधिक प्रसिद्धी मिळते. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘फिट इंडिया’ चळवळीचा विचार प्रत्येकाने आत्मसात करून तंदुरुस्तीला राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप द्यावे.’’

Goa Ironman 70.3
Vibrant Goa Summit: गोव्यात 20 हजार कोटींची गुंतवणूक, 30 हजार नोकऱ्यांचे लक्ष्य; मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.