गोव्यासाठी आनंदाची बातमी! 'हा' खेळाडू खेळणार भारतीय संघाकडून क्रिकेट; थायलंडला होणार रवाना

Basappa Madar Asian Legends Cup: राज्याचे ज्येष्ठ क्रिकेटपटू बसप्पा मदार यांची पहिल्यांदाच आयोजित होणाऱ्या आशियाई लेजेंड्स कप २०२६ साठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
Basappa Madar Asian Legends Cup
Basappa Madar AsianDainik Gomantak m
Published on
Updated on

गोव्याच्या क्रिकेटविश्वासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याचे ज्येष्ठ क्रिकेटपटू बसप्पा मदार यांची पहिल्यांदाच आयोजित होणाऱ्या आशियाई लेजेंड्स कप २०२६ साठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ही प्रतिष्ठेची खंडीय स्पर्धा २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चियांग माई, थायलंड येथे पार पडणार आहे. पश्चिम विभागातून सांगलीचे अनुभवी क्रिकेटपटू अभिजीत कदम यांनाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

बोर्ड फॉर व्हेटरन क्रिकेट इन इंडिया (बीव्हीसीआय) यांच्या वतीने ४० वर्षांवरील क्रिकेटपटूंसाठी आशिया पातळीवरील पहिलीच स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, ही निवड गोवा तसेच संपूर्ण पश्चिम विभागासाठी अभिमानास्पद ठरली आहे. या ऐतिहासिक स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, यूएई आणि हाँगकाँग हे सहा देश सहभागी होणार आहेत.

Basappa Madar Asian Legends Cup
Virat Kohli: 'किंग कोहली'चा धमाका! विश्वविक्रमापासून विराट आहे फक्त 'इतक्या' धावा दूर; दिग्गजांचे रेकॉर्ड धोक्यात

भारतीय ज्येष्ठ क्रिकेटसाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारतीय संघाचे नेतृत्व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मनप्रीत गोनी यांच्याकडे सोपवण्यात आले असून, जतिन सक्सेना यांची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या आंतर-प्रादेशिक स्पर्धांतील कामगिरीच्या आधारे संघाची रचना करण्यात आली असून, देशभरातील अनुभवी खेळाडूंचा समतोल या संघात दिसून येतो.

Basappa Madar Asian Legends Cup
Vijay Hazare Trophy: प्राथमिक फेरीत आव्हान संपले, अर्जुन तेंडुलकरसह गोलंदाजांची हाराकिरी; विजय हजारे स्पर्धेत गोव्याची परवड का?

गोवा व्हेटरन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच बीव्हीसीआयचे सचिव विनोद फडके यांनी ही निवड ऐतिहासिक असल्याचे सांगत, बसप्पा मदार आणि अभिजीत कदम यांची निवड ही विविध विभागांतील गुणवत्तेची पावती असल्याचे नमूद केले. जीव्हीसीएचे सचिव सुदेश प्रभुदेसाई यांनीही समाधान व्यक्त करत गोव्याच्या खेळाडूला ही संधी मिळणे गौरवाची बाब असल्याचे सांगितले.

Basappa Madar Asian Legends Cup
Goa Cricket: 8 चौकार, 3 षटकार! गोव्याच्या 'तनिषा'ची वादळी खेळी व्यर्थ; आंध्र प्रदेशचा 18 धावांनी विजय

आपल्या निवडीवर प्रतिक्रिया देताना बसप्पा मदार म्हणाले, “आशियाई लेजेंड्स कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे हे माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचा मला अभिमान असून, देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com