Goa Ranji Cricket: गोव्याकडून दोन्ही सामने जिंकण्याची अपेक्षा! 'एलिट' पात्रता जवळपास निश्चित

Goa Cricket: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट विभागात सलग तीन सामने जिंकलेल्या गोव्याची पुन्हा एकदा एलिट विभाग पात्रता जवळपास निश्चित बनली असून आता गटात दुसऱ्या क्रमांकासाठी नागालँड व मिझोराम यांच्यात चुरस असेल.

Goa Ranji Cricket Canva
Published on
Updated on

Goa Ranji Cricket Team

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट विभागात सलग तीन सामने जिंकलेल्या गोव्याची पुन्हा एकदा एलिट विभाग पात्रता जवळपास निश्चित बनली असून आता गटात दुसऱ्या क्रमांकासाठी नागालँड व मिझोराम यांच्यात चुरस असेल.

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांच्या मार्गदर्शनाखालील गोव्याच्या खाती सध्या १९ गुण आहेत. नागालँडचा संघ १३ गुणांसह दुसऱ्या स्थानी असून गोव्याविरुद्धच्या पराभवामुळे त्यांची आगेकूच खुंटली. मिझोराम संघाचेही १३ गुण आहेत, तर सिक्कीमने १२ गुणांची कमाई केली आहे.

प्लेट गटातील सहा संघांपैकी सुरवातीचे दोन संघ २०२५-२६ मोसमातील एलिट विभागात खेळतील, या दोन संघांत यावेळच्या प्लेट विभागातील अंतिम लढतही नियोजित आहे. प्लेट विभागातील तुलनात्मक ताकद लक्षात घेता, बाकी दोन्ही सामने जिंकण्याची गोव्याकडून अपेक्षा आहे. यापूर्वीच्या लढतीत गोव्याने मणिपूरला नऊ विकेट राखून, सिक्कीमला डाव व ५३ धावांनी, तर नागालँडला ८३ धावांनी नमविले.

Goa Cricket: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट विभागात सलग तीन सामने जिंकलेल्या गोव्याची पुन्हा एकदा एलिट विभाग पात्रता जवळपास निश्चित बनली असून आता गटात दुसऱ्या क्रमांकासाठी नागालँड व मिझोराम यांच्यात चुरस असेल.
Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

प्लेट विभागातील चौथ्या फेरी सहा नोव्हेंबरपासून खेळली जाईल. अहमदाबाद येथे गोव्याची लढत मिझोरामविरुद्ध होईल, तर सोविमा येथे नागालँड सिक्कीमविरुद्ध खेळेल. सिक्कीमकडून पहिल्याच लढतीत पराभव पत्करल्यानंतर मिझोरामने लागोपाठ दोन सामने जिंकताना कमजोर अरुणाचल प्रदेश व मणिपूरला हरविले.

प्लेट विभागातील अखेरच्या फेरीत १३ नोव्हेंबरपासून पर्वरी येथे गोवा अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळेल, तर नादियाड येथे मिझोराम व नागालँड यांच्यातील सामना गटातील दुसऱ्या क्रमांकासाठी निर्णायक ठरू शकतो. अखेरच्या फेरीत सिक्कीमसमोर मणिपूरचे आव्हान असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com