Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Panjim Municipal Corporation New Building: पणजी महानगरपालिकेचा नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ होऊन वर्ष उलटले तरी या इमारतीच्या कामाला अजून सुरवात नाही. या कामाची फाइल अद्यापि लालफितीत अडकल्याने कामाला विलंब होत आहे.
Panaji Municipal Corporation New Building
Panaji Municipal Corporation New Building Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Municipal Corporation New Building

पणजी: महानगरपालिकेचा नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ होऊन वर्ष उलटले तरी या इमारतीच्या कामाला अजून सुरवात झालेली नाही. गोवा नागरी विकास प्राधिकरणातर्फे (जीसूडा) या इमारतीची उभारणी होणार आहे, परंतु या कामाची फाइल अद्यापि लालफितीत अडकल्याने कामाला विलंब होत आहे.

राज्यात भाजपचे सरकार आहे. पणजीत भाजपचे आमदार, त्यांच्याकडेच महानगरपालिकेची सत्ता असे सर्व सत्ताकेंद्रे हातात असतानाही महानगरपालिकेच्या इमारतीच्या कामाला गती का मिळत नाही, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. गत भाजप सरकारच्या काळात तत्कालीन नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते २०२१ मध्ये या इमारतीची पायाभरणी झाली होती.

Panaji Municipal Corporation New Building
Panaji Smart City: 'स्मार्ट' बससेवा हीच का? पणजीत 'शेड'ची उभारणी अजून नाहीच

त्यावेळी महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर वसंत आगाशीकर, सचिव (नगरविकास) डॉ. तारिक थॉमस, नगरविकास सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर यांच्या उपस्थिती होती. त्यावेळी या इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे काम करण्याकरिता ११.५ कोटींची तरतूद होती. या इमारतीचा पुन्हा पायाभरणी ऑक्टोबर २०२३ मध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com