IPL 2026 Auction: दमदार कामगिरीचं फळ! सुयश, ललित अन् अभिनव आयपीएल लिलावात; गोव्याच्या त्रिकूटावर सर्वांच्या नजरा

Goa Cricketers In IPL 2026: सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व ललित यादव यांना आगामी आयपीएल क्रिकेट लिलावातील निवडक साडेतीनशे खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले आहे.
IPL 2026 Auction
IPL 2026 AuctionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: देशांतर्गत क्रिकेटमधील सध्या फलंदाजीत सातत्य प्रदर्शित करणाऱ्या गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व ललित यादव यांना आगामी आयपीएल क्रिकेट लिलावातील निवडक साडेतीनशे खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले आहे.

आयपीएल लिलाव १६ डिसेंबर रोजी अबुधाबी येथे होणार आहे. निवडलेल्या खेळाडूंची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार, आयपीएल लिलावासाठी देश-परदेशातील १३९० खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३५० जणांची निवड झाली. यामध्ये २४० भारतीय, तर ११० परदेशी क्रिकेटपटू आहेत. लिलावात एकूण ७७ खेळाडूंची निवड होईल, त्यापैकी ३१ जागा परदेशी खेळाडूंसाठी असतील.

IPL 2026 Auction
IPL Auction: काऊंटडाऊन सुरु! आयपीएल 2026 लिलावाची तारीख ठरली! रिटेन्शनची डेडलाईनही जाहीर

गोव्यातील (Goa) तिन्ही क्रिकेटपटूंसाठी बोली रक्कम ३० लाख रुपये आहे. २८ वर्षीय गोव्याचा टी-२० संघ कर्णधार सुयश यापूर्वी २०२२ ते २०२४ या कालावधीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरतर्फे ११ आयपीएल सामने खेळला आहे. कोलकाता येथे झालेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सुयशने शानदार फलंदाजी करताना १४२.५६च्या सरासरीने तीन अर्धशतकांसह २११ धावा केल्या.

IPL 2026 Auction
IPL 2026 लिलाव! 350 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर; 'या' स्टार खेळाडूची अचानक एन्ट्री, मोठी बोली लागणार?

गोव्याचा पाहुणा क्रिकेटपटू असलेला दिल्लीचा (Delhi) २९ वर्षीय ललित यादव यापूर्वी २०२१ ते २०२४ या कालावधीत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून २७ सामने खेळला आहे. नुकतेच त्याने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे सर्वाधिक धावा करताना सात सामन्यांत दोन अर्धशतकांसह १५७.१४च्या स्ट्राईक रेटने २७५ धावा केल्या.

IPL 2026 Auction
MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

पदार्पणातच अभिनवची छाप!

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे यंदा पदार्पण केलेला २५ वर्षीय डावखुरा अभिनव तेजराणा याने छाप पाडली आहे. रणजी करंडकातील पाच सामन्यांत त्याने ९३च्या सरासरीने तीन शतके व दोन अर्धशतकांसह ६५१ धावा केल्या आहेत. एलिट गटातील फलंदाजांत तो अव्वल आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत त्याने दोन अर्धशतकांसह १५१.६९च्या स्ट्राईक रेटने सात सामन्यांत १७९ धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com