U-11 National Championships: बडोद्यात गोव्याचा डंका! 9 वर्षांच्या अमायरा धुमटकरने राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पटकावले 'ब्राँझपदक'

Amyra Dhumatkar First Goan National Medalist: गोव्याची अवघी नऊ वर्षीय प्रतिभाशाली बॅडमिंटनपटू अमायरा धुमटकर हिने ११ वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरीत ब्राँझपदक पटकावण्याचा पराक्रम साधला.
Amyra Dhumatkar First Goan National Medalist
Amyra DhumatkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याची अवघी नऊ वर्षीय प्रतिभाशाली बॅडमिंटनपटू अमायरा धुमटकर हिने ११ वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरीत ब्राँझपदक पटकावण्याचा पराक्रम साधला. तिचे पदक राज्य बॅडमिंटनमध्ये ऐतिहासिक ठरले, या वयोगटात राष्ट्रीय पदकाला गवसणी घालणारी ती पहिली गोमंतकीय बॅडमिंटनपटू ठरली.

गुजरातमधील बडोदा येथे झालेल्या स्पर्धेत अमायरा हिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत दणक्यात धडक मारली. चुरशीच्या लढतीत आंध्र प्रदेशच्या श्रीआध्या रेड्डी कडुलुरी हिच्यावर पहिला गेम गमावल्यानंतर १७-२१, २१-१७, २१-१५ असा रोमहर्षक विजय संपादन केला. उपांत्य लढतीत अमायरा हिने जबरदस्त जिगर प्रदर्शित केली, पण तिला थोडक्यात माघार घ्यावी लागली. तेलंगणाच्या सायना शर्मा हिला अमायराने पहिल्या गेममध्ये २१-२३ असे कमालीचे झुंजविले, मात्र दुसऱ्या गेममध्ये ९-२१ अशी माघार घ्यावी लागल्याने गुणवान गोमंतकीय खेळाडूचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आणि फक्त दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना ब्राँझपदक मिळाले.

Amyra Dhumatkar First Goan National Medalist
National Para Athletics Championship: गोव्याची साक्षी चमकली! 23व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत केली 'सुवर्ण' कामगिरी

बडोदा येथील राष्ट्रीय स्पर्धेत अमायरा हिने मुलींच्या दुहेरीतही छाप पाडली. कोमल कोठारी हिच्यासह तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. गोवा बॅडमिंटन (Badminton) असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी अमायराच्या कामगिरीचे कौतुक करताना, “गोवा बॅडमिंटनसाठी अभिमानाचा आणि दीर्घ प्रतीक्षेनंतरचा ऐतिहासिक क्षण” असे म्हटले आहे. संघटने सचिव प्रवीण शेनॉय यांनी तिला “गोव्याची अत्यंत उज्वल आणि आशादायी तरुण खेळाडू” संबोधत स्पर्धेत दाखविलेल्या सातत्य आणि जिद्दीचे कौतुक केले.

Amyra Dhumatkar First Goan National Medalist
National Yoga Championship: राष्ट्रीय योग स्पर्धेत गोवा संघाची बक्षिसांची लयलूट! 2 सुवर्णांसह पटकावली 6 पदके

१५ महिन्यांपासून बंगळूरुमध्ये अथक सराव

गोव्यात २०२४ पासून ११ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत व दुहेरीत अव्वल मानांकित असलेली अमायर पंधरा महिन्यांपासून बंगळूर येथे अथक मेहनत घेत आहे. आता तिला बंगळूरस्थित पादुकोण बॅडमिंटन अकादमीत प्रवेश मिळाला असून तिथे ती जे. आर. श्रीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

Amyra Dhumatkar First Goan National Medalist
National Swimming Championships: गोव्याची पोरगी चमकली! राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पूर्वी नाईकने जिंकले सलग दुसरे पदक

गोव्यात (Goa) सलग दोन वर्षे अपराजित असलेल्या अमायरा हिने कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्रातील बॅडमिंटन स्पर्धांत एकेरी, तसेच दुहेरीतील विजेतिपदे पटकावली आहे. गोव्यात वयाच्या सातव्या वर्षी तिने पहिले राज्यस्तरीय प्रमुख मानांकन स्पर्धा विजेतेपद मिळविले होते, तर २०२४ मध्ये वयाच्या आठव्या वर्षी ती पहिल्यांदा राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झाली होती. गोव्यात तिने सीनियर प्रशिक्षक विनायक कामत यांच्या मार्गदर्शनाखालील बॅडमिंटनचे शास्त्रोक्त धडे गिरविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com