GCA Premier League: शंतनू नेवगी, यश कसवणकर यांची धडाकेबाज शतके; अनुभवी फिरकी गोलंदाज दर्शनचे पुन्हा डावात पाच बळी

GCA Premier League Cricket 2026: उदयोन्मुख फलंदाज शंतनू नेवगी व यश कसवणकर यांच्या धडाकेबाज शतकांनी जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील पहिला दिवस गाजवला.
GCA Premier League
GCA Premier LeagueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी ः उदयोन्मुख फलंदाज शंतनू नेवगी व यश कसवणकर यांच्या धडाकेबाज शतकांनी जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील पहिला दिवस गाजवला. या युवा फलंदाजांच्या शतकांमुळे साळगावकर क्रिकेट क्लबने मंगळवारी पणजी जिमखान्याविरुद्ध ४ बाद ३१८ धावा केल्या.

हरवळे-साखळी येथील नॅपेक्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात शंतनू व यश यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली. शंतनू याने १७० चेंडूंत १६ चौकारांच्या मदतीने ११० धावा केल्या. यश १०० धावांवर नाबाद आहे. त्याने १८० चेंडूंचा सामना करताना डझनभर चौकार मारले. 

GCA Premier League
Goa Minor Girl Sexual Assault: गोवा हादरला! 15 वर्षीय मुलीवर 2 वर्षांपासून अत्याचार, 23 वर्षीय नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर गोव्याचा अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ (५-२९) याने यंदा स्पर्धेत तिसऱ्यांदा डावात पाच गडी बाद केले. त्यामुळे गतविजेत्या चौगुले स्पोर्ट्‌स क्लबला धेंपो क्रिकेट क्लबवर पहिल्या डावात ११७ धावांची आघाडी घेता आली.

GCA Premier League
Illegal Gambling Goa: होंडा येथे गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा; 9 जणांना अटक, 52,300 रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्यही जप्त

मात्र, सामन्याच्या पहिल्याच दिवशी २२ गडी बाद झाले.  स्पर्धेतील आणखी एका सामन्यात कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर मडगाव क्रिकेट क्लबने जीनो स्पोर्ट्‌स क्लबविरुद्ध पहिल्या डावात २३८ धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com