RFDL Final 2026: एफसी गोवा संघ अंतिम फेरीत दाखल, विजेतेपदासाठी बंगळूर एफसीविरुद्ध लढत

FC Goa vs Bengaluru FC RFDL Final 2026: एफसी गोवा संघाने रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग (आयएफडीएल) यूथ फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे.
RFDL Final 2026
RFDL Final 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एफसी गोवा संघाने रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग (आयएफडीएल) यूथ फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. दोन टप्प्यांतील उपांत्य फेरीत त्यांनी पंजाब एफसीवर गोलसरासरीत ५-२ फरकाने मात केली. विजेतेपदासाठी शनिवारी (ता. १८) त्यांच्यासमोर दोन वेळच्या विजेत्या बंगळूर एफसीचे आव्हान असेल.

बांबोळी येथील अटल स्टेडियमवर बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यात पंजाब एफसीने एफसी गोवाला २-१ असे पराभूत केले, मात्र पहिल्या टप्प्यात ४-० असा एकतर्फी विजय मिळविल्यामुळे बुधवारच्या निकालाचा एफसी गोवाच्या वाटचालीवर परिणाम झाला नाही.

RFDL Final 2026
Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

पंजाब एफसीला विशाल यादव याने दुसऱ्याच मिनिटास आघाडी मिळवून दिली. २४व्या मिनिटास काव्य काटकर याने एफसी गोवास बरोबरी साधून दिली. ८३व्या मिनिटास कोन्साम सांथोई सिंग याने केलेल्या गोलमुळे पंजाब एफसीला वर्चस्व लाभले. सामन्याच्या भरपाई वेळेत एफसी गोवाच्या सिटरॉय कार्व्हालो याला रेड कार्ड मिळाले.

RFDL Final 2026
Goa Politics: भाजप-मगोच्‍या युतीवर अनेकांचे भवितव्‍य, पेडणेत बाबूंची डरकाळी; संयमी राजन कोरगावकरांनी रोवली पाळेमुळे

स्पर्धेतील अन्य उपांत्य लढतीत बंगळूर एफसीने दुसऱ्या टप्प्यातही केरळा ब्लास्टर्सवर मात करताना तीन गोल डागले. पहिल्या टप्प्यात त्यांनी ७-० असा एकतर्फी विजय मिळविला होता. त्यामुळे दोन लढतीनंतर बंगळूर एफसीची १०-० अशी सरशी झाली. अंतिम सामनाही बांबोळी येथील अटल स्टेडियमवर खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com